Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अरे या के. एल. राहुलचं करायचं काय! सेमी फायनललाही ढेपाळला

भारताची नाजक स्थिती, आजही सलामीवीर ढेपाळले

अरे या के. एल. राहुलचं करायचं काय! सेमी फायनललाही ढेपाळला

 Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडमध्ये सेमी फायनलचा सामना चालू असून फायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना जिकणं महत्त्वाचं आहे.  इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर के. एल. राहुल आणि रोहित शर्मा यांच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या. विशेष करुन के. एल. राहुलच्या बॅटींगकडे लक्ष लागून होतं मात्र आजच्या सामन्यातही के. एल. राहुल अपयशी 
ठरला आहे. 

पहिल्या षटकामध्ये राहुलने खणखणीत सुरूवात केली होती. मात्र त्याची आक्रमकता जास्त काही वेळ टिकू शकली नाही. दुसऱ्याच षटकात ख्रिस वोक्सने राहुलला आपल्या जाळ्यात ओढलं. राहुल महत्त्वाच्या सामन्यातही अवघ्या 5 धावांवर बाद झाला. राहुलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 128 धावा केल्या आहेत.  

Read More