Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 World Cup : टीम इंडियाचा मेंटर होण्यासाठी Ms Dhoni ला पैसे नाही, तर हवीय 'ही' मौल्यवान गोष्ट

धोनीचं टीम इंडियासाठी असलेलं प्रेम आपण या आधी अनेकदा पाहिलंच असेल, पण...

T20 World Cup : टीम इंडियाचा मेंटर होण्यासाठी Ms Dhoni ला पैसे नाही, तर हवीय 'ही' मौल्यवान गोष्ट

मुंबई : बीसीसीआयने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची टी -20 वर्ल्ड कपसाठी मार्गदर्शक म्हणजेच मेंटर म्हणून नियुक्ती केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी -20 वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे यावेळी देखील तो टीम इंडियाचा भाग असणार आहे, ज्यामुळे टीमला चांगलं मार्गदर्शन मिळेल. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की, धोनी यासाठी कोणतेही पैसे घेणार नाही.

धोनीचं टीम इंडियासाठी असलेलं प्रेम आपण या आधी अनेकदा पाहिलंच असेल, एवढेच काय तर धोनीने या आधी अनेक खेळाडू देखील घडवले आहे. त्याने टीम इंडियासाठी कधीही आपला स्वार्थ पाहिला नाही. त्यामुळे एम एस धोनी हा आजपर्यंतचा सर्वात दयाळू आणि प्रेमळ कॅप्टन्सपैकी एक आहे.

महेंद्रसिंग धोनीने जाहीर केले आहे की, आगामी टी -20 वर्ल्ड कपमध्ये मेंटर होण्यासाठी तो एक पैसाही घेणार नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी -20 वर्ल्ड कपमध्ये मार्गदर्शक होण्यासाठी पैसे घेणार नाही. तो हे काम कोणत्याही शुल्का शिवाय करणार आहे.

भारताने वर्ल्ड कप जिंकावा अशी धोनीची इच्छा

धोनी जगातील महान कर्णधारांपैकी एक आहे. टीम इंडियाने मेंटॉर बनण्याऐवजी वर्ल्डकप ट्रॉफी जिंकून देशाला मोठी भेट द्यावी अशी माहीची इच्छा आहे. त्यामुळे त्याने सांगितले की, मला पैसे नको तर मला देशासाठी आणि टीमसाठी हे करायचे आहे. भारताला दुसऱ्यांदा टी -20 मध्ये विश्वविजेते बनवण्याचे धोनीचे स्वप्न आहे.

आयपीएलच्या दोन दिवसांनी टी -20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. हा वर्ल्ड कपही आयपीएलप्रमाणे दुबईत होणार आहे. यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघात मेंटॉर म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. तो वर्ल्ड कपदरम्यान संघाला मार्गदर्शन करत राहील.

या वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत 14 नोव्हेंबरला करणार आहे. धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि हा विक्रम 9 व्या वेळी टीम करत आहे. आयपीएलच्या इतिहासात इतका वेळा कोणताही संघ अंतिम फेरीत इतक्या वेळा पोहोचलेला नाही.

Read More