Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धक्कादायक! लाईव्ह सामन्यादरम्यान क्रिकेटरला आला हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

Cricketer Heart Attack: सोमवार 24 मार्च रोजी खेळाडूला लाईव्ह सामन्याच्या दरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.  

धक्कादायक! लाईव्ह सामन्यादरम्यान क्रिकेटरला आला हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

Tamim Iqbal Suffers Heart Attack: बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला सोमवारी सकाळी सामना खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता त्याला ढाकाच्या बाहेरील सावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतआहेत. तमीम हा सावर येथील ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामना खेळत होता. ढाका प्रीमियर लीगदरम्यान तमिम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला.

नक्की काय झालं? 

तमिम इक्बाल ढाका प्रीमियर लीग 2025 दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात सामना खेळला जात होता. हा सामना खेळत असताना त्याला मैदानावर छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या. तिथे उपलब्ध असलेल्या क्टर आणि फिजिओने लगेच त्याची प्राथमिक तपासणी केली. यानंतर त्रास जास्त असल्याने तमीम इक्बालला फजिलातुनेसा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजीसाठी पाठवले. तिथून तमिम पुन्हा स्टेडियममध्ये जात असताना पुन्हा त्रास जाणवला. 

हे ही वाचा: इरफान पठाणचा IPL च्या कॉमेंट्री पॅनलमधून पत्ता कट, धक्कादायक कारण आले समोर

 

पुन्हा मैदानात जाताना 

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य डॉक्टर देबाशीष चौधरी म्हणाले, "पहिल्या रक्त तपासणीत डॉक्टरांना काही समस्या दिसल्या. तमीमला अस्वस्थ वाटत होते आणि त्याला ढाकाला परत जायचे होते. रुग्णवाहिका बोलावून त्याला स्टेडियममध्ये नेण्यात आले. पण वाटेत त्यांना पुन्हा छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात आणावे लागले. तेव्हा त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे आढळून आले."

हे ही वाचा: वडील ऑटो ड्रायव्हर, ना देशांतर्गत खेळण्याचा अनुभव; IPL मध्ये पदार्पण करणारा MI चा विघ्नेश पुथूर आहे तरी कोण?

 

डॉक्टर करत आहेत ऑपरेशन 

माहितीप्रमाणे, सध्या तमिम इक्बालची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत. त्याच्या कोरोनरी आर्टरीमध्ये जाळीची नळी बसवली जाईल. धमनी खुली ठेवणे आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे हा ते लावण्यामागचा उद्देश आहे.

Read More