India Vs Austrelia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे. सिलेक्टर्सच्या निर्णयामुळे आता क्रिडाविश्वात चर्चा होताना दिसत आहे.
वर्ल्ड कपपूर्वी निवड समितीने धक्कादायक निर्णय घेतले आहे. वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, ऋतुराज गायकवाड आणि प्रसिद्ध कृष्ण यांना संधी दिल्याने आता ऑस्ट्रेलियाला देखील धक्का बसलाय. तर आश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात सामील करून वर्ल्ड कप टीममध्ये येत्या काळात दोन्हीपैकी एका ऑफस्पिनरचा समावेश होऊ शकतो, याचे संकेत देण्यात आले आहे.
आणखी वाचा - IND vs AUS : ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला जोर का झटका!
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. तर 24 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी उर्वरित दोन सामने पहायला मिळतील. हे तिन्ही सामना मायदेशी होणार असल्याने टीम इंडियाचा कस लागणार आहे.
पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया:
केएल राहुल (C), रवींद्र जडेजा (VC), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (WK), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण
IND vs AUS च्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या, (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (WK), इशान किशन (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Coming next #INDvAUS
— BCCI (@BCCI) September 18, 2023
Here are the #TeamIndia squads for the IDFC First Bank three-match ODI series against Australia pic.twitter.com/Jl7bLEz2tK
IND VS AUS वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (C), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.