India's squad for Bangladesh Tests: वनडे सिरीजमध्ये पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर आता भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN Test series) यांच्या टेस्ट सिरीज खेळली जाणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता केएल राहुल (KL Rahul) नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) यांची बदली करण्यात आली आहे. (Team India squad announce for the Test series against Bangladesh 2022 marathi news)
बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे. निवड समितीने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma injury) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या डाव्या अंगठ्याच्या दुखापती झाली होती. त्यानंतर त्याने मुंबईत डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी (IND vs BAN 1st Test) रोहित उपलब्ध असणार नाही. बीसीसीआय (BCCI) वैद्यकीय पथक दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
The selection committee has also added fast bowler Jaydev Unadkat to India’s squad for the Test series.
— BCCI (@BCCI) December 11, 2022
More details here - https://t.co/LDfGOYmMkz #BANvIND https://t.co/beOdgO2SYX
केएल राहुल (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (VC), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (WK), केएस भरत (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मो. सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट