Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारत आणि बांगलादेशच्या संघादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असतानाच टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ शनिवारी रात्री जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघामधून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडबरोबरच घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या इशान किशनलाही संघातून वगळण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही वगळण्यात आलं. मात्र या साऱ्यांमध्ये ऋतुराजची कामगिरी आणि आकडेवारी त्याच्या बाजूने असतानाही त्याला संघात स्थान का नाही असा जाब आता त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे. टी-20 च्या संघामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीरचा प्रभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघांतील खेळाडूंची संख्याही बऱ्यापैकी दिसत असल्याने दुजाभाव केला जात असल्याच मतंही चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.
भारत आणि बांगलादेशदरम्यान 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. संघातील सर्वात नव्या चेहऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हैदराबादच्या संघाकडून खेळताना आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करताना नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या खेळाडूला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. नितीश कुमार रेड्डीबरोबर मयंक यादवलाही संघात स्थान देण्यात आलं असतानाच अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना वगळण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मयांक यादवला संधी मिळण्यामागेही आयपीएल 2024 मध्ये त्याने केलेली कामगिरीच कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मयंकने ताशी 150 किमी प्रति तासहून अधिक वेगाने चेंडू टाकला होता. मयांक यादवने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. मात्र ऐन फॉर्मात असताना दुखापतीमुळे तो आयपीएलचं पर्व अर्धवट सोडून गेला. तो दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता, पण त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर आणि अनोख्या शैलीमुळे भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच्या आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे संघ निवडण्यात आला असताना सध्या घरगुती स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे का असा सवाल चाहत्यांनी विचारला आहे.
नक्की वाचा >> Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर
अनेक उत्तम खेळाडूंना बीसीसीआयने नाकारलं आहे असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने 'बीसीसीआय आणि गौतम गंभीरला ऋतुराज गायकवाडबरोबर काही खासगी अडचण आहे असं वाटतंय. बीसीसीआय कडून त्याला डावललं जात आहे. तो आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज आहे,' असं स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हटलं आहे. दुसऱ्याने, संघात शुभमन गिल नाही, यशस्वी जयसवाल नाही तरीही ऋतुराजला संघात स्थान दिलं नाही असं म्हटलं आहे.
1)
Last night BCCI selected the T20 squad for Bangladesh but again BCCI ignored some talents !
— CricStrick (@CricStrickAP) September 29, 2024
No chance for Ruturaj Gaikwad !
No chance for Ishan Kishan !
No Chance for Shreyas Iyer !
The best think is Mayank Yadav is selected for the series !#BCCI | #KanpurTest pic.twitter.com/wV99pAclKW
2)
BCCI & Gautam Gambhir have some personal issues with Ruturaj Gaikwad. He is getting sidelined by BCCI and he is the 3rd best batter of India in ICC rankings. pic.twitter.com/GVDhXybbdq
— Mayank (@MayankVK18) September 28, 2024
3)
No Ruturaj Gaikwad For T20Is vs BAN
— (@imAnthoni_) September 28, 2024
- No Shubman Gill
- No Yashasvi Jaiswal
Still They Didn't Picked him and went with just 1 Opener for 3 Match Series. Unreal Politics against Rutu Fkk... pic.twitter.com/72c0PF2lWy
एकाने तर ऋतुराजच्या टी-20 कामगिरीची आकडेवारी मांडत एवढं असतानाही त्याला संघात स्थान नाही असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. अन्य एकाने श्रेयस अय्यर आणि ऋतुराजला अजून एक संधी दिली पाहिजे असं म्हटलं.
1)
RUTURAJ GAIKWAD IN T20I FOR INDIA:
— Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2024
In 2023 - 365 runs, 60.8 AVG, 147.2 SR.
In 2024 - 133 runs, 66.5 AVG, 158.3 SR.
But no place in the squad even when first openers are rested pic.twitter.com/PD0t2aXBZs
2)
No Shreyas Iyer.
— Sandeep Yadav (@SandeepYdv25) September 29, 2024
- No Ruturaj Gaikwad.
- No Ishan Kishan.
They are not selected in Team India's Squad for T20I series against Bangladesh - These players deserve one more chance. #IshanKishanDeservesBetter #IPLRetentions pic.twitter.com/RRqthGUXzP
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव.