Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.

टीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस

दुबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.

भारत अव्वल स्थानी

भारताने ही सिरीज 1-2 ने गमावली असली तरी शेवटच्या टेस्टमधील विजयामुळे भारताला फायदा झाला आहे. भारत या विजयासोबत आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आला आहे. दक्षिण आफ्रिकेने मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत जरी विजय मिऴवला तरी ती भारताची जागा नाही घेऊ शकणार.

चांदीची गदा आणि 10 लाख डॉलर

भारत आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्यांदा टॉपवर आला आहे. कर्णधार विराट कोहली आयसीस टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी गेल्यामुळे आयसीस भारताला चांदीची गदासह 10 लाख डॉलरचा चेक देखील देईल.

Read More