Yograj Singh blunt take IND vs ENG Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला अवघ्या 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी संघ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे. योगराज सिंह म्हणाले, "आपण जर आपल्या शेवटच्या फलंदाजांनाही ऑलराउंडर बनवलं असतं, तर हा सामना पाचव्या दिवशी एवढ्या संघर्षात गेला नसता. शेवटच्या फळीतले खेळाडू देखील सामना जिंकू शकतात, पण त्यांना तयार करणं गरजेचं असतं."
आपल्या संतप्त प्रतिक्रियेत योगराज सिंह पुढे म्हणाले, "मी अनेकदा सांगतो की केवळ फलंदाजांचीच नाही, तर गोलंदाजांचीही फलंदाजीची सराव घ्यायला हवा. रवींद्र जडेजावरच सगळा भार का टाकायचा? जेव्हा नीतीश रेड्डी बाद झाला, तेव्हा लोकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली. हे चुकीचं आहे." ते पुढे म्हणाले, "जर गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी होत असेल, तर त्यांच्यावर थोडं विश्वास ठेवला पाहिजे की ते चांगली फलंदाजी देखील करू शकतात. कोणताही खेळाडू जन्मत: ऑलराउंडर नसतो तर तो घडवावा लागतो."
हे ही वाचा: IND vs ENG: तोंडाजवळचा घास इंग्लंडने घेतला हिरावून... चार दिवसांच्या मेहनतीनंतर भारताचा पुन्हा पराभव
योगराज सिंह यांनी शेवटी असंही स्पष्ट मत दिलं की, "गोलंदाजांना ‘टेलएंडर’ म्हणणं चुकीचं आहे. ते संघाचे महत्वाचे भाग आहेत. जोपर्यंत सगळ्या खेळाडूंना एका पातळीवर तयार केलं जात नाही, तोपर्यंत अशा कठीण परिस्थितीत सामन्याचा निकाल आपल्या बाजूने वळवणं अवघड आहे."
हे ही वाचा: रवी शास्त्री आणि अक्षय कुमार सोबत लॉर्ड्सवर सामना बघायला आलेली 'ती' आहे तरी कोण?
लॉर्ड्समध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने शेवटच्या दिवशी चांगली कामगिरी करत भारताला पराभवाचा सामना करायला लावला. यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-2 ने पिछाडीवर आहे.