Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्मापेक्षा घातक बॅट्समन, निवड समितीमुळे कारकिर्द संपण्याच्या वाटेवर

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला (India vs Sri Lanka T 20 Series) आजपासून (24 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे.   

रोहित शर्मापेक्षा घातक बॅट्समन, निवड समितीमुळे कारकिर्द संपण्याच्या वाटेवर

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला (India vs Sri Lanka T 20 Series) आजपासून (24 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टी 20 मालिकेतील पहिले 3 सामने हे अनुक्रमे 24, 26 आणि 27 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. यानंतर 2 मॅचची टेस्ट सीरिज पार पडणार आहे. (team india young star opener prithvi shaw out of squad last 7 months  selection committie do not chance to this cricketer)

निवड समिती गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूकडे जाणिवपूर्वकर दुर्लक्ष करतेय. त्यामुळ या खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपतेय की काय, अशी भिती क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.     

क्रिकेट कारकिर्द संपण्याच्या वाटेवर?

निवड समिती या खेळाडूला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि कसोटी या मालिकेत संधी देणार, अशी शक्यता होती. मात्र तसं झालं नाही. निवड समितीने ज्या खेळाडूला डावळलं तो रोहित शर्मापेक्षा तुफानी बॅटिंग करतो. मात्र निवड समिती या खेळाडूकडे दुर्लक्ष करतेय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मुंबईकर ओपनर पृथ्वी शॉ आहे. 

सचिन-सेहवागचा कॉम्बो

पृथ्वीमध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची झळक पाहायला मिळते. पृथ्वीची बॅटिंग स्टाईल म्हणजे तेंडुलकर-सेहवागचा कॉम्बो पाहायला मिळतो. 

सचिन सेहवाग टीम इंडियासाठी ओपनिंग करायचे. यात सचिन संयमीपणे खेळायचा. तर सेहवाग दुसऱ्या बाजूला  फटकेबाजी करायचा. या दोन्ही दिग्गजांचा कॉम्बो रुप म्हणजे पृथ्वी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

पृथ्वी गेल्या काही काळापासून सातत्याने दमदार कामगिरी करतोय. मात्र यानंतरही त्याला संधी मिळाली नसल्याने आता निवड समिती त्याची कारकिर्द संपवते की काय, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.  

Read More