Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Tendulkar-Anderson Trophyचे झाले अनावरण! 17 वर्षांनंतर ‘पतौडी ट्रॉफी’चं नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Tendulkar Anderson Trophy Unveiled: सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांनी गुरुवारी नवीन अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण केले, जी भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला दिली जाईल.  

Tendulkar-Anderson Trophyचे झाले अनावरण! 17 वर्षांनंतर ‘पतौडी ट्रॉफी’चं नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Sachin Tendulkar and James Anderson: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका आज २० जून पासून रंगणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान नवीन अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण करण्यात आलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला आता ‘तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी’ दिली जाणार आहे. गुरुवारी महान भारताचा दिग्ग्ज सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या हस्ते या नव्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. याआधी या मालिकेसाठी दिली जाणारी ट्रॉफी ‘पतौडी ट्रॉफी’ म्हणून ओळखली जात होती जिची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. आता याचे नाव बदलून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे झाले आहे. ही ट्रॉफी नव्याने डिझाईन करण्यात आली असून, यावर तेंडुलकरचा आयकॉनिक कव्हर ड्राइव्ह आणि अँडरसनचा सिग्नेचर बॉलिंग अ‍ॅक्शन यांची झलकयासह दोघांचे स्वाक्षरी आहेत.

BCCI आणि ECB ची एकत्रितपणे घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड अ‍ॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्या संयुक्त निर्णयाने या नव्या ट्रॉफीची निर्मिती झाली आहे. पुढे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सर्व कसोटी मालिकांमध्ये ही ट्रॉफी दिली जाणार आहे. याआधी इंग्लंडमध्ये मालिका ‘पतौडी ट्रॉफी’साठी आणि भारतात ‘अँथनी डी मेलो ट्रॉफी’साठी खेळली जात होती.

 

पतौडी कुटुंबाशी संबंध कायम राहणार 

पतौडी कुटुंबाचा वारसा कायम राखण्यासाठी 2025 पासून प्रत्येक भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेता कर्णधाराला ‘पतौडी मेडल’ दिली जाणार आहेत.   त्यामुळे नाव बदलूनही, पतौदी कुटुंबाशी मालिकेचा ऐतिहासिक संबंध टिकवण्यात आला आहे.

पतौडी ट्रॉफीचा इतिहास काय आहे?

पतौडी ट्रॉफी 2007 मध्ये सुरू झाली होती. पहिल्याच वर्षी भारताने इंग्लंडविरुद्ध 1-0 ने विजय मिळवला होता. त्यानंतर 2011, 2014 आणि 2018 मध्ये इंग्लंडने मालिकेवर वर्चस्व गाजवलं. 2021 मधील मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. त्यातील एक सामना कोविडमुळे पुढे ढकलण्यात आला होता, जो नंतर इंग्लंडने जिंकला.

सचिन- अँडरसन, महान खेळाडूंच्या सन्मानार्थ ट्रॉफीचे नाव 

सचिन तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 329 डावांत 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या. तर दुसरीकडे, जेम्स अँडरसनने 188 कसोटींमध्ये 704 विकेट्स घेतले असून, तो कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

 

Read More