Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

प्रेग्नंसी आणि IVF मध्ये आमिर खानच्या घरी 10 महिने राहिली होती ज्वाला गुट्टा; नवरा विष्णु म्हणाला, 'त्याच्याच आशीर्वादानं...'

Jwala Gutta Stayed at Aamir Khan's House For 10 Months : आमिर खानचे अभिनेता विष्णु विशालनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. 

प्रेग्नंसी आणि IVF मध्ये आमिर खानच्या घरी 10 महिने राहिली होती ज्वाला गुट्टा; नवरा विष्णु म्हणाला, 'त्याच्याच आशीर्वादानं...'

Jwala Gutta Stayed at Aamir Khan's House For 10 Months : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान गेल्या आठवड्यात अभिनेता विष्णु विशाल आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी हैदराबादमध्ये पोहोचला होता. सगळ्यात महत्त्वाचं  म्हणजे, त्यांच्या मुलीचं नाव देखील आमिरनं ठेवलं. आमिरनं तिला ‘मीरा’ हे नाव ठेवलं. तर विष्णु विशाल आणि ज्वाला गुट्टा या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर आमिरचे आभार मानले आहेत. 

विष्णु विशालनं स्वत: आमिर खानसोबत खुलासा केला होता. त्यांनी खुलासा केला की कशा प्रकारे आमिर खाननं त्यावेळी त्यांची मदत केली, जेव्हा ज्वालानं आई होण्याची अपेक्षा देखील सोडली होती. त्यांनी सांगितलं की 'हा आमच्यासाठी असलेला हा एक खूप महत्त्वाचा क्षण होता. ज्वाला आणि मी जवळपास दोन वर्षांपासून बाळ होण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण वाढत्या वयामुळे ते शक्य होत नव्हतं.'

विष्णु पुढे म्हणाला, 'ज्वाला 41 वर्षांची आहे, त्यामुळे शक्यता कमीच होती. आम्ही अनेक IVF उपचार घेतले. 5-6 वेळा अपयशी झालो. ज्वालानं शेवटी हार मानली होती आणि हे मान्य केलं होतं की ती आता आई होणारच नाही. त्यावेळी आमिर सर हे जवळपास होते आणि जेव्हा मी त्यांना याविषयी सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळं काही सोडा आणि मुंबईला या.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

विष्णु विशालनं सांगितलं की 'मुंबईमध्ये स्वत: आमिर खान त्याला आणि ज्वाला गुट्टाला एका डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यानंतर जवळपास 10 महिने ज्वाला त्याच्या घरीच राहिल हे आमिर ठरवलं होतं. विष्णु पुढे म्हणाला की, जेव्हा केव्हा मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा ते आमच्यासोबत एका कुटुंबासारखं वागायचे. त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं तो एकप्रकारचा आशीर्वाद आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

हेही वाचा : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच लाडक्या शिक्षकाने आत्महत्या केल्याचं समजलं अन्...; मराठी सेलिब्रिटीची धक्कादायक पोस्ट

विष्णुनं पुढे सांगितलं की 'अखेर, दोन-तीन आयवीएफ सायकल्सनंतर ज्वाला प्रेग्नंट राहिली. तेव्हा मी आमिर सरांना सांगितलं की आमच्या बाळाचं नाव तुम्ही ठेवायचं. कारण जर ते नसते, तर आज मीरा आमच्या आयुष्यात नसती. त्यामुळेच त्या दिवशी ज्वालाच्या अश्रू अनावर झाले होते.'

Read More