Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फायनलपूर्वी CSK vs MI मध्ये होणार हायव्होल्टेज सामना, कधी आणि कुठे खेळवला जाणार?

MI VS CSK : MI ने मागच्या एलिमिनेटर सामन्यात सॅन फ्रॅंसिस्को यूनिकॉर्न्सला हरवून चॅलेंजर्स सामन्यात जागा मिळवली. 

फायनलपूर्वी CSK vs MI मध्ये होणार हायव्होल्टेज सामना, कधी आणि कुठे खेळवला जाणार?

MI VS CSK : सीएसकेची टेक्सास सुपर किंग्स आणि MI न्यूयॉर्क यांच्यात मेजर लीग क्रिकेटचा फायनल सामना खेळण्यासाठी हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दोन्ही संघ चॅलेंजर्समध्ये एकमेकांसमोर असतील. यात सुपर किंग्सचं नशीब खराब होतं. पहिला क्वालिफायर सामना पावसामुळे धुतला गेला. पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असल्याने सीएसके फायनलमध्ये स्थान बनवू शकली नाही. त्यामुळे आता सीएसकेला फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी MI सोबत सामना खेळावा लागणार आहे. MI ने मागच्या एलिमिनेटर सामन्यात सॅन फ्रॅंसिस्को यूनिकॉर्न्सला हरवून चॅलेंजर्स सामन्यात जागा मिळवली. 

कुठे रंगणार सामना? 

सुपरकिंग्स आणि MI यांच्यातील चॅलेंजर्स सामना हा भारतीय वेळेनुसार १२ जुलै रोजी सकाळी ५: ३० वाजता सुरु होईल. दोघांमध्ये खेळवण्यात येणारा सामना हा अमेरिकेच्या डॅलस के ग्रॅंड प्रायरी स्टेडियमवर होईल. या सीजनमध्ये MI संघाने आतापर्यंत एकदाही पराभव केलेला नाही. या सीजनमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळवण्यात आले. यातील दुसऱ्या सामन्यात सुपरकिंग्सने MI ला ३९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. या सीजनमध्ये सुपर किंग्ज चॅलेन्जर सामन्यात या हंगामात सलग तिसर्‍या वेळी एमआयला पराभूत करण्याच्या तयारीत असेल, चॅलेन्जरमध्ये सुपर किंग्जला हरवून आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करेल. 

जिंकणारा संघ वॉशिंगटन फ्रीडम सोबत खेळणार : 

सुपर किंग्स आणि MI मधील जो संघ चॅलेंजर्स सामना जिंकेल तो संघ फायनलमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये नंबर १ वर असणाऱ्या वॉशिंगटन फ्रीडम सोबत खेळणार आहे. वॉशिंग्टन आणि सुपरकिंग्समध्ये होणारा सामना हा पावसामुळे रद्द झाला. ज्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर असणारा वॉशिंग्टन संघ थेट फायनलमध्ये पोहोचला. 

 

Read More