Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबई क्रिकेट संघटनेच्या मैदानांचा गैरवापर, सावंत याचा आरोप

मुंबई क्रिकेट संघटनेच्या वांद्रे आणि कांदिवलीमधल्या मैदानांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप माजी अध्यक्ष रवी सावंत यांनी केलाय.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या मैदानांचा गैरवापर, सावंत याचा आरोप

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या वांद्रे आणि कांदिवलीमधल्या मैदानांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप माजी अध्यक्ष रवी सावंत यांनी केलाय.

क्रिकेटची प्रतिमा मलिन 

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईमध्येच क्रिकेटची प्रतिमा मलिन झाल्याचं चित्र आहे. रणजी संघांचा घसरलेला दर्जा, कार्यकारीणीची मुदत संपलेली असतानाही घेतल्या न जाणाऱ्या निवडणुका, लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात होणारी टाळाटाळ आणि प्रमुख प्रशिक्षकांचं राजीनामासत्र यामुळे संघटनेतला गोंधळ चव्हाट्यावर आलाय.

आशिष शेलार यांची चुपी

आता सावंत यांनी संघटनेचे अध्यक्ष आशिष शेलार यांना एक पत्र लिहिलंय. तर शेलार यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मैदानांचा होत असलेल्या गैरवापराबाबत कोण पाठिशी घातल आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. 

Read More