Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ashes Test: बॉल आहे की बंदुकीची गोळी! रोबिन्सन झाला वेगाचा बादशाह, उस्मानच्या दांड्या गुल; पाहा Video

Usman Khawaja Wicket Video: कॅप्टन स्टोक्सने माईंड गेम (Mind Game) खेळला. बॉल बाऊसर येणार असल्याचं भासवलं आणि ओली रॉबीन्सनने परफेक्ट यॉर्कर केला. रॉबीन्सनने (Oli Robinson) अचूक यॉर्कर टाकत ख्वाजाचा त्रिफळा उडवला. 

Ashes Test: बॉल आहे की बंदुकीची गोळी! रोबिन्सन झाला वेगाचा बादशाह, उस्मानच्या दांड्या गुल; पाहा Video

England vs Australia, The Ashes 2023: अ‍ॅशेसची पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Aus vs Eng) यांच्यात खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पुन्हा कमबॅक केलंय. उस्मान ख्वाजाने 321 बॉलचा सामना करून 141 धावा करत इंग्लंडला सडेतोड उत्तर दिलंय. उस्मान ख्वाजा वगळता इतर कोणत्याही खेळाडूंना मोठी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या रस्त्यातील काटा मोडीस काढला तो ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याने.

ऑस्ट्रेलिया संघाचे उर्वरित पाच फलंदाज केवळ 75 धावांमध्ये त्यांनी माघारी पाठवले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा शतकवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एक आगळीवेगळी क्षेत्ररक्षणाची रचना केली होती. मात्र, ख्वाजा आऊट व्हायचं नाव घेत नव्हता. त्यावेळी बेन स्टोक्सने (Ben Stokes) ओली रॉबिन्सनकडे बॉल सोपवला. ओली रॉबीन्सन बॉलिंग करत असताना त्याने खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन खेळाडू उभे केले. बॉल बाऊसर येणार अशी शक्यता निर्माण केली. मात्र, योजना मात्र वेगळीच होती.

आणखी वाचा - शतक ठोकल्यावर बॅट का फेकली? ट्रोल झाल्यानंतर उस्मान ख्वाजाने दिलं असं उत्तर, म्हणाला...

कॅप्टन स्टोक्सने माईंड गेम (Mind Game) खेळला. बॉल बाऊसर येणार असल्याचं भासवलं आणि ओली रॉबीन्सनने परफेक्ट यॉर्कर केला. रॉबीन्सनने अचूक यॉर्कर टाकत ख्वाजाचा त्रिफळा उडवला. बॉल यॉर्कर आल्याने उस्मान ख्वाजाला बॅट फिरवता आली नाही. बॉल गोळीच्या स्पीडने आला उस्मान ख्वाजाच्या दांड्या गुल झाल्या. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.

पाहा Video

दरम्यान, उस्मान ख्वाजाने 321 बॉलमध्ये 141 धावा केल्या. शकत झाल्यानंतर त्याने जंगी सेलिब्रेशन केलं. त्यावेळी त्याने बॅट फेकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. इंग्लंडमध्ये धावा करता येत नाहीत, असं नेहमी म्हटलं जात होतं. म्हणून हे शतक माझ्यासाठी नेहमीपेक्षा थोडं अधिक भावनिक होतं. माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असं उस्मान ख्वाजा म्हणाला आहे. 

Read More