Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ठरलं तर! World Test Championship चा फायनल सामना 'या' मैदानावर रंगणार

गेल्या वर्षी न्यूझीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून पहिल्या ICC च्या वर्ल्ड टेस्ट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं. 

ठरलं तर! World Test Championship चा फायनल सामना 'या' मैदानावर रंगणार

मुंबई : टेस्ट क्रिकेट चॅम्पियन जेतेपद राखण्यासाठी सध्या न्यूझीलंडचा संघर्ष सुरु आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून पहिल्या ICC च्या वर्ल्ड टेस्ट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं. आता कसोटी चॅम्पियनशिपची दुसरी फेरी सुरू असून न्यूझीलंडची स्थिती बिकट आहे. गुणतालिकेत ही टीम खूपच खालच्या क्रमांकावर आहे. 

त्यामुळे न्यझीलंड पुढील वर्षी अंतिम फेरीत गाठू शकेल का? हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र अशा परिस्थितीत अजून एक प्रश्न सर्वांच्या मनात आहे तो म्हणजे, टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कुठे खेळवली जाणार आहे?

WTC फायनल लॉर्ड्सवर होणार!

क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या माहितूीनुसार, आयसीसीला 2023 चा अंतिम सामना लॉर्ड्सवरच आयोजित करायचा आहे आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. 

टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या वर्षी साउथॅम्प्टनमध्ये खेळला गेला होता. मात्र तो मुळात लॉर्ड्सवर खेळला जाणार होता, परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर तो बदलण्यात आला होता.

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, मला वाटतं लॉर्ड्सने ठरवलं आहे. विचार नेहमी योग्यच होता. हे जूनमध्ये आहे. आपण आता कोविडमधून बाहेर आलो आहोत. शिवाय सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर आणि सज्ज स्थितीतच लॉर्ड्सवर याचं आयोजन करण्याचा आमचा विचार आहे.

Read More