Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World cup 2019 : सेमी-फायनलपर्यंतचा मार्ग खडतर, पण अशक्य नाही- होल्डर

वेस्ट इंडिजला ३०० पेक्षा धावा करुन देखील विजयी होता आले नाही.

World cup 2019 : सेमी-फायनलपर्यंतचा मार्ग खडतर, पण अशक्य नाही- होल्डर

टाँटन : बांगलादेश विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात काल (१७ जून) ला मॅच खेळण्यात आली. या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा पराभव केला. वेस्ट इंडिजने बांगलादेशला विजयासाठी ३२२ रनचे आव्हान दिले होते. बांगलादेशने हे विजयी आव्हान ३ विकेट गमावून ८ ओव्हर आधीच पूर्ण केले. 

वेस्ट इंडिजला ३०० पेक्षा धावा करुन देखील विजयी होता आले नाही. या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कॅप्टन जेसन होल्डर याने प्रतिक्रिया दिली. होल्डर म्हणाला, ' या पराभवानंतर वेस्ट इंडिज टीमची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे, पण अशक्य नाही', 'आम्ही यापुढील प्रत्येक मॅच ही फायनल मॅचप्रमाणे खेळणार आहोत. आम्हाला प्रत्येक मॅच जिंकावी लागेल, त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहील', असा आशावाद होल्डरने व्यक्त केला. 

वेस्टइंडडिजच्या पुढील २ मॅच न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्या विरुद्ध होणार आहे. या दोन्ही टीम यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पराभूत झालेल्या नाहीत. 'आम्हाला सेमीफायनलमध्ये धडक मारायची असेल तर सर्वश्रेष्ठ टीमचा पराभव करावा लागेल. आम्हाला स्वत:वर असलेला विश्वास कायम ठेवाव लागेल', असे होल्डर म्हणाला.

वेस्टइंडडिजने वर्ल्डकप २०१९ मध्ये आतापर्यंत एकूण ५ सामने झाले आहेत. यापैकी एक मॅच पावसामुळे रद्द करावी लागली. वेस्टइंडिजला केवळ १ मॅचमध्येच विजयी होता आले. तर ३ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लगाला. वेस्टइंडिज पॉइंट्सटेबलमध्ये ३ पॉइंट्ससोबत  सातव्या क्रमांकावर आहे.  

 

Read More