What is the Final Prize Money of WTC 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनल सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (WTC Final 2025, australia vs south africa) यांच्यात 11 जूनपासून फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून यंदाचा फायनल विशेष ठरणार आहे. कारण यावेळी विजेत्या संघाला मिळणारी बक्षीस रक्कम ही आयपीएल (IPL 2025) च्या विजेत्या संघाला मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) च्या तिसऱ्या सिजनच्या विजेता संघाला तब्बल 3.6 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 30.88 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम मागील दोन सिजनच्या तुलनेत खूप मोठी आहे. 2021 आणि 2023 मध्ये केवळ 1.6 मिलियन डॉलर्स इतकीच प्राईज मनी होती. यंदा, उपविजेत्या संघालाही मोठं बक्षीस देण्यात येणार असून त्यांना 2.16 मिलियन डॉलर्स, म्हणजेच जवळपास 18.50 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. मागच्या वेळेस ही रक्कम फक्त 8 लाख डॉलर एवढी होती.
हे ही वाचा: IPL ट्रॉफीची किंमत किती असते माहितेय? झळाळती ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? किंमत ऐकून व्हाल थक्क
ICC कडून टेस्ट क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न सुरु असून बक्षिसांच्या रूपात मोठा बदल करण्यात आलाय. उदाहरण द्यायचं झालं तर, IPL 2025 मध्ये विजेता ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूला फक्त 20 कोटी रुपये मिळाले होते.
हे ही वाचा: IPL चा एक सामना हरल्यावर किती रुपयांचं नुकसान होतं? समजून घ्या ‘कोट्यवधींचं गणित'
जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर ते सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावतील. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC ) ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली आहे. 2021 मध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत करून पहिले विजेतेपद पटकावले होते, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती.
यंदाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल केवळ क्रिकेटमधील प्रतिष्ठेबद्दलच नाही, तर पैशाच्या बाबतीतही मोठा ठरणार आहे. विजेत्या संघाला आयपीएल पेक्षाही जास्त रक्कम मिळणार असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना खूपच विशेष ठरणार आहे.