Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

2025 च्या अखेरपर्यंत 3 दिग्गज टेस्ट क्रिकेटला ठोकणार रामराम? निवृत्ती घेऊन फॅन्सला देणार झटका

Test Cricket : मे महिन्यात भारताचा माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट आणि रोहितच्या या तडकाफडकी निवृत्तीमुळे त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. आता तुम्हाला अशा स्टार क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत जे 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. 

2025 च्या अखेरपर्यंत 3 दिग्गज टेस्ट क्रिकेटला ठोकणार रामराम? निवृत्ती घेऊन फॅन्सला देणार झटका

Test Cricket : वर्ष 2025 सुरु असताना क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. परंतु यापूर्वीच मे महिन्यात भारताचा माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट आणि रोहितच्या या तडकाफडकी निवृत्तीमुळे त्यांच्या फॅन्सना धक्का बसला. आता तुम्हाला अशा स्टार क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत जे 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. 

रवींद्र जडेजा :

भारताचा दिग्गज ऑलराऊंडर रवींद्र जडेजा हा 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. जडेजा हा सध्या 36 वर्षांचा असून रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर जडेजा 2013 पूर्वी भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा एकमेव सक्रिय क्रिकेटर आहे जो अजूनही भारताकडून टेस्ट फॉरमॅटमध्ये खेळतोय. रवींद्र जडेजा हा भारत - इंग्लंड यांच्यात होणारी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा सुद्धा भाग आहे. जडेजाने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये 323 विकेट घेतल्या असून 3370 धावा केल्या आहेत. जडेजाने विराट आणि रोहित सह 2024 च्या वर्ल्ड कपनंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

स्टीव स्मिथ :

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथ हा सुद्धा 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. स्टीव स्मिथने यापूर्वीच वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. स्टीव स्मिथ हा ऑस्ट्रेलियाकडून 100 हून जास्त टेस्ट सामने खेळले आहेत. स्टीव स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये 10000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यासह तो ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या संघाचा सुद्धा भाग होता. 36 वर्षांचा स्टीव स्मिथ हा  2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. 

हेही वाचा : IND VS ENG : विराट आणि रोहितची जागा कोण घेणार? 'या' अनकॅप्ड खेळाडूला संधी, अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

 

केमार रोच :

वेस्टइंडीजचा अनुभवी गोलंदाज केमार रोच हा 2025 च्या अखेरपर्यंत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. जून-जुलै 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या या अनुभवी टेस्ट क्रिकेटपटूला संघातून वगळण्यात आले. त्याने आतापर्यंत  85 टेस्ट सामने खेळले असून यात त्याने 284 विकेट घेतल्या आहेत.

Read More