त्रिनिनाद : श्रेयस अय्यर हा क्रिकेट टीम इंडियातील उदयोन्मुख स्टार खेळाडूंपैकी एक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयसने संघासाठी 54 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर टीमने 3 रन्सने सामना जिंकला. यादरम्यान श्रेयस भर मैदानात डान्स करताना दिसला, जो चाहत्यांनाही खूप आवडला. पण आता श्रेयसनेच त्यामागील कारण सांगितलं आहे.
श्रेयस अय्यरने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजशी संवाद साधताना त्याच्या या डान्समागचं कारण सांगितलं. तो म्हणाला, 'मी फिल्डींग करत होतो आणि वेस्ट इंडिजचे चाहते मला चिडवत होते. कॅच सोडा, कॅच सोड असं, तो म्हणत होता. अशा परिस्थितीत जेव्हा कॅच माझ्याकडे आला तेव्हा मी त्यांच्यासारखाच नाचलो.
श्रेयसच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, त्याची प्रतिक्रिया वेस्ट इंडिजच्या प्रेक्षकांच्या कृतीला चोख प्रत्युत्तर होती. मुळात, श्रेयस खूप चांगला डान्सर असून तो त्याच्या सोशल मीडियावर स्वतःच्या डान्स मूव्हचे व्हिडिओ शेअर करत असतो. शिवाय श्रेयसची सख्खी बहीण देखील उत्तम डान्सर आहे.
From last-over heroics in the 1st #WIvIND ODI courtesy @mdsirajofficial to rocking some dance moves ft @ShreyasIyer15, presenting a fun interview that oozes swag - by @28anand
— BCCI (@BCCI) July 23, 2022
Full interview https://t.co/tau2J3GcBh #TeamIndia pic.twitter.com/4rou4918Zi
पहिल्या वनडे सामन्यानंतर मोहम्मद सिराज आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज श्रेयस अय्यर यांनी एकमेकांची मुलाखत घेतली. बीसीसीआयने या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केलाय. याच मुलाखतीत सिराजने श्रेयसशी शेवटच्या ओव्हरबद्दल चर्चा केली. त्याचवेळी श्रेयसने शामराह ब्रूक्सचा झेल घेतल्यानंतर नेमका का डान्स केला याचा खुलासा केला.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) July 23, 2022
टीम इंडिया रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. कर्णधार शिखर धवनला तीन सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी टीमच्या खेळाडूंकडून पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय टीमने पहिला एकदिवसीय सामना 3 रन्सने जिंकला. दुसरा वनडे सामना जिंकून शिखर धवन सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तो टीमच्या प्लेईंग 11मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो.