How Rinku Singh met with Priya Saroj: आज रिंकू सिंह आणि प्रिया सरोज हे दोघंही चर्चेचा विषय (Rinku Singh-Priya Saroj Engagement) ठरले आहेत . याचे कारण असे की एक क्रिकेटमधील तरुण, मेहनती खेळाडू, तर दुसरीकडे राजकारणातील युवा चेहरा अशी जोडी. रिंकूने अलीगढसारख्या ठिकाणाहून मिडलक्लास कुटुंबातून येऊन क्रिकेटच्या मैदानावर स्वतःचं नाव कमावलं. तर प्रिया कॉन्व्हेंट शिक्षण घेतलेली आणि राजकीय वारसा लाभलेली संसदेतली नवीन, तरुण चेहरा आहे. दोघांची प्रेमकहाणीही तितकीच फिल्मी आणि अनोखी आहे.
8 जून रोजी लखनऊमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा पार पडला. तर 18 नोव्हेंबर 2025 रोजी या दोघांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. सुमारे दीड वर्षांपासून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत, आणि नंतर त्यांच्या कुटुंबीयही या नात्याला मान्यता दिली.
Rinku Singh Priya Saroj pic.twitter.com/dsgtmFyqWa
— Parinda (@Parthian_1) June 8, 2025
२०२३ साली अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात टक्कर होती. 240 मिनिटांच्या सामन्यात 236 मिनिटांपर्यंत गुजरातचं वर्चस्व होतं. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये केकेआरला विजयासाठी 29 धावांची गरज होती. उमेश यादवने स्ट्राईक रिंकूकडे सोपवण्यात आली आणि पुढचे पाच चेंडू इतिहासात नोंदवले गेले.
रिंकूने सलग पाच षटकार ठोकले आणि केकेआरला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. तो क्षण फक्त एक विजय नव्हता, तर रिंकूच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. ड्रेसिंग रूमपासून क्रिकेट वर्तुळात त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली.
हे ही वाचा: क्रिकेटर रिंकूची जीवनसाथी होणारी प्रिया सरोज कोण आहे आणि ती काय करते? जाणून घ्या
या ऐतिहासिक सामन्यानंतर काही दिवसांतच रिंकू एका टीममधील सीनियर प्लेयरच्या लग्नासाठी दिल्लीला गेला होता. तिथे त्याचा ओळखीच्या मित्रामुळे प्रिया सरोजशी ओळख झाली. ओळखीतून मैत्री झाली आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. एकमेकांना समजून घेण्यात जवळपास दीड वर्ष गेलं. दोघांनी आपल्या नात्याला गंभीरपणे घेतलं आणि शेवटी कुटुंबीयांच्या संमतीने हे नातं अधिकृत केलं गेलं.
हे ही वाचा: Video: रिंकू सिंगच्या हातावर पाच षटकारांची खूण, बघा स्टार क्रिकेटरचा अनोखा टॅटू
एकीकडे क्रिकेटचा ग्लॅमर आणि मैदानातील मेहनत, तर दुसरीकडे राजकारणातील युवा नेतृत्व, दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून आज एकत्र येत आहेत. यासह क्रिकेटर आणि खासदार एकत्र येणार आहे.