Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात 'या' व्यक्तीचा हात

माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री यांना हटवण्यामागे एका बड्या व्यक्तीचा हात असल्याचं या खेळाडूने म्हटलंय

शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात 'या' व्यक्तीचा हात

दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय. रशीद लतीफ यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री यांना हटवण्यामागे एका बड्या व्यक्तीचा हात आहे. रशीद लतीफ यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हा दावा केलाय.

धक्कादायक खुलासा

रशीद लतीफ यांनी खळबळजनक दावा करत म्हटलंय की, 'सौरव गांगुली यांनी रवी शास्त्री यांना कोचच्या पदावरून हटवलं आहे. हे सर्व T-20 वर्ल्डकपपूर्वी झालं. अनिल कुंबळेला चुकीच्या पद्धतीने कोचपदावरून हटवल्यानंतर या सर्व गोष्टींना सुरुवात झाली असल्याचं लतीफ यांनी म्हटलंय. 

रशीद लतीफ यांनी म्हटलं की, 'कुंबळेने 600 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेतल्या होत्या. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड हे त्याचे साथीदार होते. हे त्रिकूट खूप मजबूत आहे. यानंतर लतीफ यांनी दावा केलाय की, गांगुली यांनी, शास्त्रींना तुमच्या जाण्याची वेळ आली आहे, असं सांगितलं असणार. 

रशीद लतीफ म्हणाले की, शास्त्री यांनी प्रशिक्षक म्हणून पुढे जाण्याचा विचार केला असेल. हा सगळा प्रकार T-20 वर्ल्डकपपूर्वी होत होता. दरम्यान त्याचा परिणाम भारतीय क्रिकेटवर झाला आहे.

Read More