Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL मध्ये लागली नाही बोली, तरीही कमावले 380000000; कोण आहे हा खेळाडू? जाणून घ्या

IPL Player Earned 38 Crore: आयपीएलमध्ये असा एक क्रिकेटपटू होता ज्याच्यावर कधीही बोली लावण्यात आली नाही, परंतु त्याने या लीगमधून 38 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली. 

IPL मध्ये लागली नाही बोली, तरीही कमावले 380000000; कोण आहे हा खेळाडू? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने क्रिकेटच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही ग्लोबली सर्वात मोठी लीग बनली आहे. दरवर्षी याचा नवीन सीजन सुरु होणार याकडे सगळ्यांकडे लक्ष असते. आयपीएलच्या सुरुवातीपासून, लोकप्रियता आणि व्यावसायिकतेमुळे या लीगने जगभरातील चाहत्यांना त्याच्याकडे आकर्षित केले आहे. 2025 च्या आयपीएल लिलावाही कांगुप गाजला. लखनऊ सुपरजायंट्सने ऋषभ पंतवर सर्वात मोठी बोली लावली गेली. पण तरीही बोली न लागणाऱ्या खेळाडूने बक्कळ कमाई केली आहे. आयपीएलमध्ये असा एक क्रिकेटपटू होता ज्याच्यावर कधीही बोली लावण्यात आली नाही, परंतु त्याने या लीगमधून 38 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली. चला जाणून घेऊयात कोण आहे हा खेळाडू? 

कोण आहे हा खेळाडू?

बोलू लागली नसूनही 38 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई करणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर होता. खरतर 2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाली तेव्हा लिलावापूर्वी एक मोठा प्रश्न होता की भारतातील मोठ्या खेळाडूंवर बोली कशी लावली जाईल? यावर खूप चर्चा झाली कारण हे सगळेच खेळाडूंची नावे मोठी होती आणि त्यांच्यासाठी बोली लावणे हे एक कठीण काम होते. त्यावेळी तेव्हाचे आयपीएल कमिशनर ललित मोदीने एक नवीन आयडिया दिली. या आयडियानुसार भारतातील स्टार खेळाडूंना लिलावात पाठवू नये जेणेकरून त्यांच्यासाठी बोली लावण्यात अडचण येऊ नये. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या आयडियाचे कौतुक केले आणि लगेचच त्याला मान्यता देण्यात आली. यानंतर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांना मार्की खेळाडू म्हणून निवडण्यात आले. या खेळाडूंना कोणत्याही बोलीशिवाय थेट आयपीएल संघात समाविष्ट करण्यात आले.

हे ही वाचा: सारा की अवनीत... शुभमन गिल कोणासोबत आहे रिलेशनशिपमध्ये? स्वतःच केला खुलासा, म्हणाला - 3 वर्षांपासून...

 

सचिन तेंडुलकरने कशी केली कमाई? 

सचिन 2008 ते 2013 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला.  2008, 2009 आणि 2010 या पहिल्या तीन हंगामात सचिनने प्रत्येक सीजनमधून अंदाजे 4.5 कोटी रुपये कमावले. त्यानंतर पुढील तीन सिजनमध्ये त्याची बक्षीस रक्कम 8.25 कोटी रुपये करण्यात आली. अशाप्रकारे, सचिनने त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत एकूण 38 कोटी 29 लाख 50 हजार रुपये कमावले आणि 2013 मध्ये त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली.

Read More