Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

olympics : पदकविजेत्या मीराबाई चानूला सरकारकडून मोठं गिफ्ट

मीराबाईवर कौतुक आणि भेटवस्तूंसह नव्या संधींचीही बरसात 

olympics : पदकविजेत्या मीराबाई चानूला सरकारकडून मोठं गिफ्ट

मणिपूर : ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताची पताका उंचावर धरणाऱ्या आणि देशाच्या नावे रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रांतून तिला शुभेच्छा देण्यासोबतच अनेक बक्षीसंही दिली जात आहेत. त्यातच आता खऱ्या अर्थानं मीराबाईला आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. कारण, तिची थेट अतिरिक्त पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार मणिपूर सरकारनं ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती, खेळाडू मीराबाई चानू हिची नियुक्ती Additional Superintendent of Police (Sports) अर्थात अतिरिक्त पोलीस अधिक्षकपदी केली आहे. मणिपूर सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 

दरम्यान, नुकतंच मीराबाई चानू भारतात परतली आहे. देशात पाऊल ठेवताच सातासमुद्रापार दमदार कामगिरी करणाऱ्या मीराबाईचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गेल्या 5 वर्षांपासून आपण टोक्यो ऑलिम्पिकसाठी समर्पकपणे तयारी केली होती, असं मीराबाईनं सांगितलं. 

भारताला टोकियो ऑल्मिपिकमध्ये सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता असून, वेटलिफ्टिंगमध्ये हे पदक मिळू शकतं. या खेळात सुवर्णपदक मिळालेल्या महिला खेळाडूची डोपिंग चाचणी होणार आहे. या चाचणीच्या निकालावर भारताच्या सुवर्मपदकाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मीराबाई चानूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगसाठी रौप्य पदक मिळालं होतं. पण, त्यानंतरच डोपिंग चाचणीसंदर्भातील ही माहिती समोर आली. तेव्हा आता या डोपिंग चाचणीच्या अहवालाकडेच सर्वांचं लक्ष असेल. 

Read More