12 एप्रिल रोजी आयपीएल 2025 मध्ये एक दमदार सामना बघायला मिळाला. हा सामना पंजाब आणि हैदराबाद यांच्यात रंगला होता. पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात चौकार, षटकार आणि धावा भरपूर होत्या. पण यामधेच एक वेगळीच घटना घडली. धावनच्या उत्साहात वादही शिगेला पोहोचला होता. ऑस्ट्रेलियाचे दोन स्टार खेळाडू आपापसात भांडताना दिसले. त्यांच्यातील जोरदार वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्यातील भांडण पंच आणि मार्कस स्टोइनिस यांनी थांबवले. हे दुसरे तिसरे कोणी नसून ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल हे होते.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने हैदराबाद संघासमोर 246 धावांचे डोंगराळ लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. नवव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने मॅक्सवेलला जबरदस्त षटकार ठोकत हेडला डिवचलं. दरम्यान, मॅक्सवेलने चेंडू हेडकडे फेकला, त्यानंतर त्याचा सय्यम सुटला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पण, मार्कस स्टोइनिसने मध्यस्थी करून दोघांनाही शांत केले.
Heat moment between Glenn Maxwell and Travis Head.
— CricAsh (@ash_cric) April 12, 2025
: @StarSportsIndia | #SRHvPBKS pic.twitter.com/bjPnOPyhms
हे ही वाचा: 'अरे, तू माझ्याकडे काय घेत आहेस, तिकडे बघ ..' रोहित शर्माने कॅमेरामॅनलाच दिली ऑर्डर, मजेशीर Video Viral
हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड आतापर्यंत अपयशी ठरले होते. पण दोघांनीही या सामन्यात धुमाकूळ घातला. दोघांनीही फक्त 74 चेंडूत 171 धावांची भागीदारी केली. ट्रॅव्हिस हेडने 66 धावांची तुफानी खेळी केली तर अभिषेक शर्माने विक्रमी शतक झळकावून हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हे ही वाचा: धोनीसाठी CSK ने काढली ऋतुराजची विकेट? 'हा' Video Viral झाल्यावर चाहत्यांना पडला प्रश्न
या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्माला अनेक वेळा आराम मिळाला. तो अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला, पण तो नो बॉल ठरला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि फक्त 40 चेंडूत शतक झळकावले.अभिषेकने 14 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 141 धावांची खेळी खेळली आणि विजयाचा नायक ठरला.