Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral

Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.

India Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral

Womens T20I Tri-Series final Video : टीम इंडियाच्या पोरा पोरींनी बुधवारचा दिवस मैदानावर गाजवला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत मालिका खिशात घातली. तर इकडे पोरींनीही वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक मारली. विजयानंतर खेळाडू काय करतात, तो विजय ते कसा साजरा करतात हे जाणून घ्यायला सर्वसामान्य आणि क्रिकेटचाहते उत्सुक असतात. अशातच ड्रेसिंग रूममधील (Dressing Rooms Video) खेळाडूंचा जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल होतो. मग बुधवारी तर पोरा पोरींनी विजयानंतर एकच जल्लोष केला. 

आमच्या तुमच्यासारखा ट्रेडिंग गाण्यावर डान्स!

विजयाचा आनंद हा सर्वांचं होतो. जेव्हा गोष्ट देशाची असते तेव्हा प्रत्येक भारतीय अभिमानाने आणि उत्साहाने हा विजय साजरा करतो. मग जेव्हा मैदानात उतरुन दोन हात करुन जे खेळाडू हा विजय मिळवतात त्यांचा उत्साह तर काही औरच असतो. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर ट्रेडिंग गाण्यावर डान्स करताचे रील्स आपण पाहत आलो आहोत. खेळाडू असले तरी ते आमच्या तुमच्यासारखी माणसं आहेत. तर खेळाडूंचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

जीत की खूषी!

टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा केला. हा व्हिडिओ महिला संघातील महत्त्वाच्या सदस्य असलेल्या राजेश्वरी गायकवाडने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उपकर्णधार स्मृती मानधना, स्नेह राणा, पूनम यादव आणि जेमिमा रॉड्रिग्स देखील दिसत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काला चष्मावर डान्स!

अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या (Team India win under 19 T20 womens World Cup) फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत पोरींनी इतिहास रचला. विशेष म्हणजे ही टूर्नामेंट जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे. तेव्हाही पोरींनी काला चष्मावर जबरदस्त डान्स केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये मंधाना आणि हरमनप्रीतची नावे पहिल्या तीनमध्ये आहेत. अशा स्थितीत आजच्या सामन्यात या दोन खेळाडूंकडून विशेष कामगिरीची अपेक्षा असेल.

Read More