Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

RCB च्या माजी खेळाडूने अडल्ट साइटवर खोललं अकाउंट, म्हणाला 'मी इथे पॉर्न....'

Tymal Mills : प्रसिद्ध क्रिकेटर टायमल मिल्सने 'Only Fans' या अडल्ट साईटवर अकाउंट खोललं आहे. यामुळे क्रिकेट यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली.   

RCB च्या माजी खेळाडूने अडल्ट साइटवर खोललं अकाउंट, म्हणाला 'मी इथे पॉर्न....'

Tymal Mills : क्रिकेटर्स आणि अडल्ट इंडस्ट्री यांचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही. मात्र या दरम्यान आरसीबीचा स्टार खेळाडू राहिलेल्या टायमल मिल्सने ( Tymal Mills) अडल्ट साइट 'Only Fans' वर अकाउंट लाँच करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तो असं करणारा जगातील पहिला क्रिकेटर बनलाय. या विषयावर प्रतिक्रिया देताना त्याने अजिबात वेळ घालवला नाही मिल्सने सांगितलं की, तो हे स्पष्ट करू इच्छितो की, त्याच्या अकाउंटवर क्रिकेट संदर्भातील कंटेंट शेअर केला जाणार आहे. 

द एथलेटिक सोबत बोलताना टायटल मिल्सने सांगितलं की, 'मी एक हजार टक्के स्पष्ट करू इच्छितो की अकाउंटवर कोणतेही ग्लॅमर्स शॉट्स शेअर केले जाणार नाहीत. इथे फक्त क्रिकेट आणि लाईफस्टाईल संदर्भातील कंटेन्ट शेअर केला जाईल. हे एक अज्ञात क्षेत्र असू शकते. पण याबाबत मी खूप उत्सुक आहे'.

मला माहितीये याला पॉर्न... : 

टायमल मिल्सने पुढे हे देखील सांगितलं की, 'ही कोणतीही लपवण्यासाठी गोष्ट नाही हे सर्वांनाच माहितीये की 'ओनली फॅन्स' ला पॉर्नसाठी ओळखलं जातं. पण मी इथे या संदर्भात काहीही बोलणार नाही. मिल्ससाठी लोकप्रिय होणं आणि डिजिटल, टीव्ही स्क्रीनवर येणं काही नवीन गोष्ट नाही. तो क्रीडा पत्रकारितेचा विदयार्थी सुद्धा राहिलाय. त्याने स्काय स्पोर्टस, बीबीसी आणि टॉक स्पोर्ट सारख्या मोठ्या एजन्सीमध्ये सुद्धा काम केलंय. तो स्वतः पेपरमध्ये कॉलम सुद्धा लिहितो. यातून होणारी कमाई तो आपला सहखेळाडू राहिलेल्या मॅट होब्डेनच्या आठवणीत दान करतो. 

टायमल मिल्स सांगतो की, Only Fans च्या माध्यमातून तो सरळ आपल्या फॅन्स सोबत कनेक्शन स्थापित करू शकतो. त्याने म्हटले की, 'सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर खेळाडू मीडियाशी बोलतात. पण त्याला बदलून आणि वाढवून चढवून सांगितलं जातं. मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माझं बोलणं मांडेन, एका क्रिकेटशी जोडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींविषयी लोकांना अवगत करून देईन'.

हेही वाचा : यशस्वीने संघ सोडण्याचा घेतला होता निर्णय, रोहितच्या सांगण्यावरून घेतला यू-टर्न, मोठा खुलासा

 

FAQ : 

1. टायमल मिल्सने कोणत्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट लाँच केले आहे आणि त्यामुळे का चर्चा होत आहे?

टायमल मिल्सने 'OnlyFans' या अडल्ट कंटेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट लाँच केले आहे. तो असा निर्णय घेणारा जगातील पहिला क्रिकेटर आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

2. टायमल मिल्सच्या आयपीएल कारकिर्दीचे काय झाले?

मिल्सने 2017 मध्ये RCB साठी 5 सामन्यांत 5 विकेट घेतले, ज्यावेळी त्याला 12 कोटी रुपयांना खरेदी केले गेले होते. 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 1.5 कोटींना संघात घेतले, पण तो आपली छाप पाडू शकला नाही

3. टायमल मिल्स OnlyFans वर अकाउंट का उघडत आहे?

मिल्सला आपल्या चाहत्यांशी थेट संपर्क साधायचा आहे. त्याने म्हटले की, सामन्यापूर्वी आणि नंतर मीडियाशी बोलताना खेळाडूंच्या बोलण्याला वेगळे रूप दिले जाते. OnlyFans च्या माध्यमातून तो आपले विचार, क्रिकेटमधील चांगल्या-वाईट अनुभव आणि जीवनशैली चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे

 

Read More