Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अंपायर की नायर... कोणाचा निर्णय योग्य? PBKS vs DC सामन्यात Six वरून झाला वाद

IPL 2025 : शनिवारी झालेल्या सामन्याचा टॉस दिल्ली कॅपिटल्सने जिंकून त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात पहिली इनिंग सुरु असतानाच अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, याच कारण ठरला फलंदाजाने मारलेला एक सिक्स. 

अंपायर की नायर... कोणाचा निर्णय योग्य? PBKS vs DC सामन्यात Six वरून झाला वाद

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 66 वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (DC VS PBKS) यांच्यात खेळवण्यात आला. पंजाब किंग्स (Punjab Kings) प्लेऑफसाठी यापूर्वीच क्वालिफाय झाली होती, आता ते पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शनिवारी झालेल्या सामन्याचा टॉस दिल्ली कॅपिटल्सने जिंकून त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात पहिली इनिंग सुरु असतानाच अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, याच कारण ठरला फलंदाजाने मारलेला एक सिक्स. 

नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्सच्या इनिंगमधील 15 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शशांक सिंहने जोरदार शॉट खेळला. बाउंड्री लाईनवर उभ्या असलेल्या करुण नायरने बॉल पकडला परंतु कॅच पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरला नाही. करुण नायर नुसार त्याचा पाय कॅच पकडताना बाउंड्री लाईनवर लागला होता. त्यामुळे अंपायरने काहीही म्हणण्या अगोदर नायरने दोन्ही हात उंचावत हा सिक्स असल्याचा इशारा केला. कॅमेऱ्यात सुद्धा करुण नायरचा पाय बाउंड्री लाईनच्या खूप जवळ असल्याचे दिसत होते. परंतु तरीही अंपायरने त्याला सिक्स दिला नाही. अंपायरच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

fallbacks

हेही वाचा : ड्रेसिंग रूममधील गोष्टी लीक करणं भोवलं? मुंबईकर खेळाडूची टीम इंडियातून हकालपट्टी

पंजाब किंग्सने दिलं 200 हुन अधिक धावांचं आव्हान : 

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट गमावून 206 धावा केल्या. यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या तर मार्कस स्टोनीसने 44 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सकडून मुस्ताफिझूर रहमानने 3, विप्राज आणि कुलदीपने 2 तर मुकेश कुमारने 1 विकेट घेतली. पंजाब किंग्सने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले. 

Read More