Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

U19 ENG vs SA : विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral

U19 ENG vs SA  Aaryan Sawant Run Out: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 कसोटीत विचित्र रनआऊटची क्रिकेट जगतामध्ये चर्चा होत आहे.   

U19 ENG vs SA : विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral

U19 ENG vs SA Jorich van Schalkwyk Injured: क्रिकेट खेळात विकेट पडणे हा खेळ बदलणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. शिवाय यातील रनआऊट हा तर क्षणार्धात खेळाची गती बदलू शकतात. हे रनआऊट कधी कधी एवढे विचित्र असतात की ते नेहमीच लक्षात राहतात. अलीकडेच झालेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-१९ कसोटी सामन्यात एक विचित्र पद्धतीचा रनआऊट बघायला मिळाला. या रनआऊटचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र रनआऊटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षक थोडक्यात बचावला. एक मोठा अपघात टळला. या विचित्र रनआऊटचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

नक्की काय झालं? 

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 106/2 वर 11 धावांवर फलंदाजी करणाऱ्या आर्यन सावंतपुढे डावखुरा फिरकी गोलंदाज जेसन रोल्सचा आला. त्याच्या बॉलवर आर्यनने स्वीप शॉट मारला. त्याने खूप जोरदार स्वीप शॉट मारला. त्याचा बॉल शॉर्ट-लेग क्षेत्ररक्षक झोरिच व्हॅन शाल्कविकच्या दिशेने वळवला आणि त्याच्या हेल्मेटला लागला. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला आदळल्यानंतर माघारी येत स्टंपवर धडकला. या विकेटमुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी विकेटचा आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण व्हॅन शाल्क्विक दुखापतीमुळे जमिनीवरच पडून राहिला, त्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. यावेळी इंग्लंडचा फलंदाज आर्यन सावंतही क्रीझच्या बाहेर होता. ज्यामुळे यष्टिरक्षकाच्या अपीलनंतर तिसऱ्या पंचाने फलंदाजाला बाद घोषित केले.

हे ही वाचा: क्रिकेटर मोहम्मद सिराज करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईने केले स्पष्ट

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

 

हे ही वाचा: मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी

रिप्लेमध्ये दिसले नक्की कुठे लागले 

या घडलेल्या विचित्र घटनेचा रिप्ले घेण्यात आला. त्यामध्ये दिसून आले की बॉल  क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागला नसून त्याच्या गुडघ्याला लागला आहे. बॉल  एवढा जोरदार होता की झोरिच व्हॅन शाल्क्विकला जबर मार लागला आणि तो जमिनीवर कोसळा. त्याला एवढे जोरात लागले की त्याला पाहण्यासाठी वैद्यकीय टीमला मैदानातच यावे लागले. त्यानंतर थोड्या वेळाने झोरिच व्हॅन शाल्क्विक पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. 

हे ही वाचा: IND vs ENG: 'स्वत:ला 360 वेळा कानाखाली मारा...' सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोवर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

 

बरोबरीत सुटला रोमहर्षक सामना

हा सामना अतिशय रोमहर्षक होता. हा सामना बरोबरीत सुटत अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 299 धावा केल्या त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 319 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने 336 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 317 धावांचे लक्ष्य होते.

Read More