IND VS ENG : एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून येथे ते 2 जुलै पासून दुसरा टेस्ट सामना खेळणार आहेत. भारताच्या वरिष्ठ पुरुष संघासोबतच भारताचा अंडर 19 पुरुष संघ सुद्धा 27 जून पासून इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहेत. पहिल्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सच्या घातक गोलंदाजी समोर इंग्लंडचा संघ 174 धावांवर ऑल आउट झाला. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वातील टीम इंडियामध्ये (Team India) 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला निवडण्यात आलं. या सामन्यात स्टार फलंदाज असलेल्या वैभवने गोलंदाजीत सुद्धा आपला हात आजमावला.
वैभव सूर्यवंशीने यासामन्यात 1 ओव्हर गोलंदाजी केली आणि त्याने यात फक्त 2 धावा दिल्या. मात्र यात वैभवच्या गोलंदाजीपेक्षा त्याने घातलेल्या जर्सीची चर्चा रंगली. वैभव दरवेळी 12 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. मात्र इंग्लंड विरुद्ध अंडर-19 वनडे सामन्यात तो 18-नंबर जर्सी घालून खेळायला उतरला. 18-नंबर जर्सी ही भारतीय संघात विराट कोहलीची जर्सी म्हणून ओळखली जाते. विराट सुरुवातीपासून 18-नंबर जर्सी घालून मैदानात उतरला होता.
Ayush Mhatre and Vaibhav Suryavanshi opening for India U19.
Mufaddal Vohra (mufaddal_vohra) June 27, 2025
Suryavanshi wearing No.18 jersey. pic.twitter.com/ZbluTCUejI
विराट कोहलीने टेस्ट आणि टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे फॉरमॅटमध्येच खेळताना दिसणार आहे. मागच्या काही कालावधीत वैभव सूर्यवंशी असे दुसरे भारतीय क्रिकेटर आहेत ज्याने विराटच्या निवृत्तीनंतर 18-नंबर जर्सी घालती. यापूर्वी मुकेश कुमार देखील इंग्लंड विरुद्ध सराव टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या ए संघाकडून जर्सी घालून उतरला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अंडर-19 वनडे सीरीज 27 जून पासून सुरु झाली आहे. दोन्ही संघातील दुसरा वनडे सामना हा 30 जून तर तिसरा सामना हा 2 जुलै रोजी होईल. चौथा आणि पाचवा वनडे सामना हा 5 आणि 7 जुलै रोजी होईल. तुम्हाला सांगू इच्छितो की भारताचा महिला संघ सुद्धा इंग्लंड दौऱ्यावर असून ते उद्या पासून 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. त्यानंतर त्यांच्या वनडे सीरिज सुद्धा खेळवण्यात येईल.