Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

श्रेयस अय्यरला डावलून KKR कर्णधारपद Venkatesh Iyer कडे देणार?

कालच्या सामन्यात कोलकात्याचा फलंदाज व्येंकटेश अय्यर पुन्हा एकदा फेल गेला.

श्रेयस अय्यरला डावलून KKR कर्णधारपद Venkatesh Iyer कडे देणार?

मुंबई : आयपीएलच्या 41 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यात कोलकात्याचा फलंदाज व्येंकटेश अय्यर पुन्हा एकदा फेल गेला. यानंतर अय्यरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी एका युझरने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आता त्याला केकेआरचा कॅप्टन बनवण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही सामन्यांपासून व्येंकटेश अय्यर फ्लॉप ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध पुन्हा व्येंकटेशला ओपनिंगची संधी दिली. मात्र कालच्या सामन्यात देखील त्याला केवळ 6 रन्स करता आले. यानंतर त्याच्यावर फार टीका करण्यात आला. 

यावेळी सोशल मीडियावर युझर्सने व्यंकटेश अय्यरला टीमबाहेर काढा असं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने त्याच्या करियरचा हा शेवट असल्याचं सांगितलंय. 

याशिवाय एकाने व्यंकटेश अय्यरला पुन्हा ओपनिंगला न उतरवण्याचा सल्ला दिला होता. तसंच व्येंकटेश अय्यर सर्वात खराब खेळाडू असल्याची पोस्टही करण्यात आली आहे.

दरम्यान कालच्या सामन्यात व्येंकटेश अय्यरचा टीममध्ये पुन्हा समावेश केल्याने एक चाहता चांगलाच संतापला होता. यावेळी त्याने, अय्यरला केकेआरचा कर्णधार बनवा असं, रागाच्या भरात म्हटलं आहे. शिवाय काहींनी त्याला निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला आहे. 

Read More