Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला

 विदर्भाचा ७८ धावांनी विजय झाला आहे. 

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला

नागपूर : रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा विजय झाला आहे. या विजयामुळे विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकण्याची कामगिरी केली आहे. हा सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सुरु होता. विदर्भाचा ७८ धावांनी विजय झाला आहे. 

 

विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी  २०६ धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या सौराष्ट्राला केवळ १२७ धावाच करता आल्या.  विदर्भाच्या या विजयात फिरकीपटू आदित्य सरवटने महत्वाची भूमिका निभावली. त्याने सौराष्ट्राच्या पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

Read More