नवी दिल्ली : पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये टी २० टुर्नामेंट पेशावर जाल्मीच्या टीमने गुरूवारी एका महत्त्वाच्या सामन्यात कराची किंग्जला ४४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात कराचीचा पराभव झाला पण, शाहिद आफ्रिदी आपल्या जुन्या रंगात पाहायला मिळाला.
Shahid Afridi
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) March 15, 2018
Six
Six
Six
Six#PSL2018 #KKvPZ pic.twitter.com/6Gd4jV6zAT
शाहिद आफ्रिदीने आक्रमक फलंदाजी करताना चार चेंडूत लगोपाठ चार षटकार लगावले. पीएसएलच्या इतिहास असा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. ४४ चेंडूत १०९ धावांची गरज होती. त्याने ८ चेंडूत ४ षटकांच्या मदतीने झटपट २६ धावा केल्या.