Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

व्हिडिओ : दर्शकानं टाळी वाजवल्यानं नाराज वॉर्नरनं अशी दिली खुन्नस

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा उप-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादात अडकलाय. 

व्हिडिओ : दर्शकानं टाळी वाजवल्यानं नाराज वॉर्नरनं अशी दिली खुन्नस

केपटाऊन : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा उप-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादात अडकलाय. 

न्यूलँड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकावरिुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आऊट होऊन पॅव्हिलियनमध्ये परतणाऱ्या वॉर्नरची एका प्रेक्षकाशी बाचाबाची झाली. 

१४ बॉल्समध्ये ३० रन्स ठोकणारा वॉर्नर रबाडाच्या एका बॉलवर आऊट झाला. याअगोदरच्या रबाडाच्या तीन बॉल्सवर त्यानं चौकार, षटकार आणि पुन्हा एकदा चौकार ठोकला होता. 

आऊट झाल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये परतत असताना एका प्रेक्षकानं मात्र त्याच्यासमोर येत टाळ्या वाजवल्या... आणि काही हावभावही केले... ज्यामुळे वॉर्नर चिडला... त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली... तेव्हा सुरक्षा रक्षकानं हस्तक्षेप करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

 

त्यानंतर ऑस्ट्रेलिया टीमचा सुरक्षा मॅनेजर फ्रँक दिमासी खाली आले आणि त्यांनी सुरक्षा गार्ड तसंच संबंधित प्रेक्षकाशी संवाद साधला. 

यापूर्वीही सीरीजमध्ये वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिका टीमचा विकेटकीपर क्विंटन डिकॉक यांच्यात वाद झाला होता. वॉर्नरनं दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅटसमन क्विंटनवर पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला होता.  

Read More