नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये इमरान ताहिर याला चेन्नईच्या टीमने खरेदी केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या इमरान ताहिर याला १ कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने खरेदी केलयं. गेल्या आयपीएलमध्ये इमरान रायझिंग पुणे सुपरजायंटच्या टीममधून खेळत होता.
टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी बॉलर्समध्ये इमरानचं नाव घेतलं जातं. मात्र, नुकत्याच झालेल्या भारत-आफ्रिका सीरिज दरम्यान इमरानला आपलं चांगलं प्रदर्शन दाखवता आलं नाही. त्यामुळे त्याच्या परफॉरमन्सवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, पाकिस्तान सुपर लीगमध्ये इमरानने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे.
सध्या दुबईत सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये इमरान ताहिर जबरदस्त फॉर्मात आहे. मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये इमरानने हॅटट्रिक घेतली आहे. टी-२० फॉरमॅटमधील ही त्याची दुसरी हॅटट्रिक आहे.
पीएसएलमध्ये इमरानने १६वी ओव्हर टाकताना हॅटट्रिक घेतली. सर्वात आधी दुसऱ्या बॉलवर हसन खानची विकेट घेतली.
OUT! 15.2 Imran Tahir to Hasan Khan
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 3, 2018
Watch ball by ball highlights at https://t.co/j75kdcX6hA#MSvQG #HBLPSL #Cricingif #PSL2018 pic.twitter.com/X4GGF5TtN1
त्यानंतर जॉन हॅस्टिंगला गुगली टाकत आऊट केलं.
OUT! 15.3 Imran Tahir to John Hastings
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 3, 2018
Watch ball by ball highlights at https://t.co/j75kdcX6hA#MSvQG #HBLPSL #Cricingif #PSL2018 pic.twitter.com/D6xaymi6p5
आणि नंतर राहत अलीला आऊट केलं.
OUT! 15.4 Imran Tahir to Rahat Ali
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 3, 2018
Watch ball by ball highlights at https://t.co/j75kdcX6hA#MSvQG #HBLPSL #Cricingif #PSL2018 pic.twitter.com/YgAH4NJnRW
३ वेळा हॅटट्रिक - अमित मिश्रा, अँड्र्यू टाइ
२ वेळा हॅटट्रिक - लेनोक्स कुश, युवराज सिंग, टीम साउथी, अल अमील हुसैन, इमरान ताहिर