Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MI च्या खेळाडूला धोनीकडून भर मैदानात 'बॅट ट्रीटमेंट'; सामना संपताच असं काय घडलं?

IPL 2025 CSK vs MI : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्याती एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल   

MI च्या खेळाडूला धोनीकडून भर मैदानात 'बॅट ट्रीटमेंट'; सामना संपताच असं काय घडलं?

IPL 2025 CSK vs MI : मुंबई आणि चेन्नईच्या संघांमध्ये खेळवण्यात आलेला आयपीएलचा सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. एकिकडे दोन मोठे संघ एकमेकांशी भिडणार असल्यामुळं सुट्टीच्या दिवशी अनेक क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तर, दुसरीकडे खेळाडूंनीसुद्धा या सामना तितक्याच कमाल पद्धतीनं रंगवला, तोही अगदी अखेरच्या क्षणापर्यंत. 

क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक खेळाडू कायमच त्यांचं वेगळेपण जपत असतो आणि महेंद्रसिंह धोनीसुद्धा याला अपवाद नाही. 'कॅप्टन कूल' अशी त्याची फार आधीपासूनची ओळख. आपल्या शांत स्वभावासह दमदार कामगिरी करणारा हाच माही MI सोबतच्या सामन्यात कमालीचा Action Mode मध्ये दिसला. सामन्यातील त्याचे अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले, त्यातही एका मजेशीर व्हिडीओनं तर नेटकऱ्यांना खळखळून हसण्यास भाग पाडलं. 

CSK आणि MI च्या सामन्यात माहीनं मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची फिरकीच घेतली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना संपल्यानंतर धोनी काहीसा खोडकरपणा करताना दिसला आणि त्यानं मजेशीर अंदाजात चहरला बॅटच मारली. 

सामना पार पडल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना भेटत होते. त्याचवेळी चहर आणि धोनी आमनेसामने आले. तितक्यातच धोनीनं अतिशय विनोदी अंदाजात चहरला बॅटनं मारलं. माहीची ही प्रतिक्रिया चहरला अनपेक्षित होती, ज्यामुळं या मजेशीर क्षणानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संवादही झाला. या निमित्तानं चहर आणि धोनीमध्ये असणारं कमाल नातंही चर्चेचा विषय ठरलं. 

हेसुद्धा वाचा : IPL 2025: 'मुंबईचा पहिला सामना देवाला यंदाही ट्रॉफी जिंकणार?' सूर्यकुमार प्रश्न ऐकून हसत म्हणाला, 'ही स्पर्धा...'

चेन्नई- मुंबईतील सामना कसा रंगला? 

चेन्नई सुपर किंग्सनं रविवारी पार पडलेल्या सामन्यात मुंबईच्या संघावर 4 विकेटनं मात केली अन् आयपीएलच्या यंदाच्या पर्वात दमदार सुरुवात केली. घरच्याच मैदानावर या संघानं मुंबईच्या संघाला नमवलं आणि गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या खेळाडूंना फलंदाजीमध्ये फारसं यश मिळालं नाही आणि संघानं अवघ्या 155 धावांचं लक्ष्य चेन्नईपुढं ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघानं 19.1 षटकांमध्ये 6 गडी गमावत सामना खिशात टाकला आणि क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला. 

 

 

Read More