मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून महेंद्रसिंग धोनीला डच्चू देण्यात आला. निवड समितीच्या या निर्णयानंतर धोनीची टी-२० कारकिर्द संपल्यात जमा आहे. २०२० साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत धोनी खेळणार नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्या विकेट कीपरच्या शोधात असल्याचे संकेत निवड समितीनं दिले होते. निवड समितीच्या बैठकीला विराट आणि रोहितही उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या सहमतीशिवाय धोनीला वगळण्यात आलं असेल का? असा सवालही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं विचारला. गेल्या काही दिवसांमधला धोनीचा फॉर्म बघता निवड समितीनं हा निर्णय घेतला.
एकीकडे धोनीला टी-२० टीममधून वगळण्यात आलेलं असताना आपण अजूनही तितकेच चपळ आहोत हे धोनीनं दाखवून दिलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये धोनीनं फक्त ०.०८ सेकंदांमध्ये स्टम्पिंग केलं. वेस्ट इंडिजची बॅटिंग सुरु असताना २८व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजानं बॉल टाकला. वेस्ट इंडिजचा किमो पॉल हा बॉल खेळण्यासाठी क्रिजच्या बाहेर आला. पण धोनीनं डोळ्याच्या पापण्या लवायच्या आत बॉल स्टम्पला मारला.
धोनीनं बेल्स उडवल्यानंतर अंपायरनं तिसऱ्या अंपायरकडे जायचा निर्णय घेतला. पण किमो पॉलला आपण आऊट असल्याचं आधीपासून माहिती होतं. त्यामुळे तो मैदान सोडून गेला.
Quickest stumping & That precious smile...
— Prakash MSD'ian (@shadowOfMahi) October 29, 2018
If there is anything faster than the speed of light in this world, it should be DHONI's stumping#Dhoni #INDvWI pic.twitter.com/D87rTTjcWu
धोनीचा खराब फॉर्म वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्येही कायम राहिला. भारताकडून खेळताना धोनीला १० हजार रन पूर्ण करायला धोनीला आणखी १ रनची गरज आहे. वनडे क्रिकेटमध्ये मात्र धोनीनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. धोनीनं वनडेमध्ये आत्तापर्यंत १०,१७३ रन केले आहेत. २००७ साली आफ्रिका एकादशविरुद्ध आशिया एकादशकडून खेळताना धोनीनं ३ मॅचमध्ये १७४ रन केले होते.
भारताकडून खेळताना धोनीनं आत्तापर्यंत ९,९९९ रन केले आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या चौथ्या वनडेमध्ये धोनीनं २३ रन केले. यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये धोनीनं १२ इनिंगमध्ये ६८.१० च्या स्ट्राईक रेटनं २५२ रन केले आहेत.