Viral Video of Cricketer Death: क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामना रंगात असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या खेळाडूने जोरदार षटकार मारल्यानंतर काही क्षणातच त्याचे प्राण गेले. ही घटना पाहून उपस्थित सर्व जण हादरले आहेत. शिवाय ही बातमी ऐकून लोक सुन्न झाले आहेत. नक्की काय झालं हे जाणून घेऊयात...
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातल्या गुरुहर साहाय येथे रविवारी सकाळी डीएवी स्कूलच्या मैदानात क्रिकेट सामना सुरू होता. या दरम्यान एक अत्यत वाईट घटना घडली आहे. या सामन्या दरम्यान, हरजीत सिंह (Harjeet Singh ) नावाचा खेळाडू फलंदाजी करत होता. त्याने एका चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकला. पण त्यानंतर तो हळूहळू चालत पिचच्या मध्यभागी आला आणि जमिनीवर बसला. काही क्षणातच तो खाली भर मैदानातच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला, असे स्पष्ट झाले आहे.
हरजीत सिंहने या सामन्यात चांगली फलंदाजी करत 49 धावा केल्या होत्या. पण त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या मृत्यूचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मैदानावर उपस्थित त्याच्या सहकारी खेळाडूंनी त्याला तात्काळ सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
पंजाब के फिरोज़पुर में छक्का मारने के बाद अचानक क्रिकेटर के साथ बड़ी अनहोनी, बीच मैदान पर हुई मौत#Punjab #Ferozpur #Cricket #HeartAttack | #ZeeNews pic.twitter.com/gq0o5u4KXr
— Zee News (@ZeeNews) June 29, 2025
हरजीत सिंह हा व्यावसायिकरित्या कारपेंटर होता. त्यांचे मित्र सांगतात की, ते अगदी तंदुरुस्त होता. कोणतीही आरोग्यविषयक तक्रार नव्हती. तो खेळात खूप उत्साहाने सहभागी होत होते. पण सामना रंगात आला असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली.