Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO: बाऊंड्रीजवळ टीम इंडियाचे फिजीओ पॅट्रिक यांनी दाखवला अजब बॅलन्स

श्रीलंकेविरोधातील तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने आपला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. टीम इंडियाच्या बॉलर्सने श्रीलंकेच्या टीमला १३५ रन्सवरच रोखलं.

VIDEO: बाऊंड्रीजवळ टीम इंडियाचे फिजीओ पॅट्रिक यांनी दाखवला अजब बॅलन्स

मुंबई : श्रीलंकेविरोधातील तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने आपला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. टीम इंडियाच्या बॉलर्सने श्रीलंकेच्या टीमला १३५ रन्सवरच रोखलं.

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या मॅचमध्ये एक वेगळचं दृष्य कॅमेऱ्यात कैद झालं. मैदानात टीम इंडिया आपलं कर्तुत्व दाखवत होती तर दुसरीकडे बाऊंड्रीबाहेर टीम इंडियाचे फिजीओ पॅट्रिक फरहार्ट आपली कला दाखवत होते. 

श्रीलंकन बॅट्समन बॅटिंग करत होते आणि त्यांनी १०९ रन्सवर सहा विकेट्स गमावले होते. यावरुन स्पष्ट दिसत होतं की, श्रीलंकन टीम या मॅचमध्ये काही खास परफॉर्मन्स दाखवू शकत नाहीये.

त्याचवेळी मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण करणारा कॅमेरा अचानक बाऊंड्रीजवळ वळला. त्याठिकाणी टीम इंडियाचे फिजीओ पॅट्रिक फरहार्ट बसले होते. पॅट्रिक यांनी पाण्याची बाटली आपल्या डोक्यावर ठेवत बॅलन्स करत होते आणि ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

फिजीओ पॅट्रिक फरहार्ट यांचं हे कृत्यू पाहून कमेंट्री करणाऱ्या सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर यांना हसू आवरलं नाही. दोघांनीही पॅट्रिक यांच्या डोक्याची तुलना अशा पिचसोबत केली ज्या ठिकाणी खूप रन्स करता येऊ शकतात.

Read More