VIDEO : धोनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किंग खाननं साक्षीला असं केलं ट्रिट
Updated: Apr 12, 2018, 04:49 PM IST
शाहरुख अनेकदा आपला पराभव सकारात्मकतेने घेताना मैदानात दिसलाय. आपला पराभवही तो आनंदानं स्वीकार करतो.
मुंबई : मंगळवारी एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)च्या 11 व्या सीझनच्या मॅचमध्ये चेन्नईनं कोलकाताला पाच विकेटनं पछाडलं. यामुळे आपल्याच घरगुती मैदानात दोन वर्षानंतर विजयी सलामी ठोकली. कोलकाताननं चेन्नईसमोर 203 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. यजमान टीमनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक बॉल बाकी असताना पाच विकेट गमावत हे आव्हान पूर्ण करत विजय मिळवला. या पराभवानंतरही शाहरुख खाननं विजयी टीमला दिलेल्या शुभेच्छा कॅमेऱ्यात कैद झाल्यात.
या मॅचदरम्यान अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. मॅच दरम्यान पहिल्यांदा शाहरुख खान महेंद्र सिंग धोनीची मुलगी जीवा हिच्यासोबत खेळताना दिसला. पण, धोनीकडून आपल्या टीमला पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही त्यानं धोनीची पत्नी साक्षी सिंह धोनी हिला मिठी मारत विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शाहरुख अनेकदा आपला पराभव सकारात्मकतेने घेताना मैदानात दिसलाय. आपला पराभवही तो आनंदानं स्वीकार करतो. त्यामुळेच, चेन्नई-कोलकाता मॅचनंतर शाहरुखनं साक्षीला दिलेल्या गळाभेटीचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर वायरल होताना दिसला. जीवासोबत मस्ती करतानाचेही शाहरुखचे फोटो सोशल मीडियावर हिट ठरलेत.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.