Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Video: मोहम्‍मद सिराजने लॉर्ड्सवर 'या' खेळाडूला वाहिली श्रद्धांजली; क्रिकेटशी नाही संबंध, जिंकली चाहत्यांची मनं

Mohammed Siraj Pays Tribute: लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत जेमी स्मिथला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने एक ऍक्शन केली. या अ‍ॅक्शने त्याने एका दिग्गज खेळाडूला श्रद्धांजली वाहिली.   

Video: मोहम्‍मद सिराजने लॉर्ड्सवर 'या' खेळाडूला वाहिली श्रद्धांजली; क्रिकेटशी नाही संबंध, जिंकली चाहत्यांची मनं

India vs England 3rd Test Day 2: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज याने लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर तिसऱ्या कसोटीत विकेट मिळवल्यानंतर एक खास सेलिब्रेशन केलं. हे सेलीब्रेशन त्याने केल्यानंतर अनेकांना त्याची अ‍ॅक्शन समजली नाही. अनेकांना त्याच्या सेलिब्रेशनचा अर्थ समजला नाही. तर त्याने त्या पद्धतीने सेलिब्रेशन करत लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डिओगो जोटालाचे काहीच दिवसांपूर्वी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मोहम्‍मद सिराजच्या हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

स्मिथला बाद करताच खास ऍक्शनने दिला सन्मान

दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज जेमी स्मिथ याला सिराजने धोखादायक लेंथवर चेंडू टाकत ध्रुव जुरेलकडे झेल द्यायला भाग पाडलं. त्यानंतर सिराजने डिओगो जोटाच्या सिग्नेचर सेलिब्रेशन शैलीत दोन्ही हात कानावर नेऊन आकाशाकडे पाहत श्रद्धांजली दिली.

 

कुलदीप यादवनेही सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

सिराजचा हा भावनिक इशारा क्रिकेटच्याच नव्हे तर फुटबॉलप्रेमींच्याही काळजाला भिडला. टीममधील फिरकीपटू कुलदीप यादव यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत जोटाला आदरांजली वाहिली: “2020 मध्ये करार केला, 20 क्रमांक घेतला आणि तो कायमचा आपला केला. आज फुटबॉलने काही गमावले नाही, तर जगाने एक तेजस्वी हास्य गमावले आहे. पोर्तो असो, वुल्व्हज असो किंवा लिव्हरपूल- तू सर्वांच्या हृदयात घर केलं.”

 

कोण होता डिओगो जोटा?

जोटा आणि त्याचा भाऊ अँड्रे सिल्वा हे पोर्तुगालच्या दुसऱ्या डिव्हिजनमधील पेनाफिएलसाठी खेळत होते. हे दोघं स्पेनमधून ब्रिटनला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांच्या लॅम्बोर्गिनी कारला अपघात होऊन ती पेटली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर पोर्तुगालमधील गोंडोमार येथे अंत्यसंस्कार झाले.

हे ही वाचा: दुर्दैवी! लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांनंतर कार अपघातात स्टार खेळाडूचे झाले निधन, भावाचाही झाला मृत्यू

 

जोटाचा फुटबॉल कारकिर्दीतला ठसा मोठा 

फक्त 28 वर्षांचा असलेला जोटा लिव्हरपूलसाठी एक महत्त्वाचा खेळाडू होता. 2020 मध्ये वुल्व्ह्जकडून लिव्हरपूलमध्ये दाखल झाल्यानंतर, त्याने क्लबसाठी प्रीमियर लीग, एफए कप आणि दोन ईएफएल कप जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पोर्तुगालसाठी 49 सामने खेळून 14 गोल केले. तो 2019 आणि 2025 मध्ये युएफा नेशन्स लीग विजयी संघाचा भाग होता. काही आठवड्यांपूर्वीच त्याने स्पेनविरुद्धच्या फायनलनंतर संघासोबत विजय साजरा केला होता.

 

क्रिकेट आणि फुटबॉलच्या पलीकडचा भावनिक क्षण

मोहम्‍मद सिराजने जोटाला दिलेली श्रद्धांजली हे एक स्मरणीय उदाहरण आहे की क्रीडाजगतातील भावना फक्त खेळापुरत्या मर्यादित नसतात. त्या हृदयाशी जोडलेल्या असतात , मग तो खेळ क्रिकेट असो वा फुटबॉल.

Read More