Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विरुष्काने ऑस्ट्रेलियात साजरं केलं नवीन वर्ष

विराट कोहलीने शेअर केला फोटो

विरुष्काने ऑस्ट्रेलियात साजरं केलं नवीन वर्ष

मुंबई : जगभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का हे देखील नव्या वर्षाचं स्वागत करताना दिसत आहे. विराट आणि अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही पार्टी लूकमध्ये दिसत आहे. अनुष्का आणि विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि त्यांनी तेथेच नव्या वर्षाची पार्टी केली. विराट कोहलीने दोघांचा काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा ही विराट कोहलीला हग करताना दिसत आहे. रस्त्यावर क्लिक केलेला हा फोटो आहे. 

फोटो शेअर करत विराट कोहलीने म्हटलं आहे की, "सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. माझ्या घरापासून जगभरातील प्रत्येकाला ऑस्ट्रेलियातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. देव सगळ्यांची काळजी घेवो.' 

अनुष्का शर्माचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर 21 डिसेंबरला रिलीज झाला. सिनेमातील अनुष्का शर्माच्या भूमिकेचं कौतूक झालं. या सिनेमात अनुष्काने दिव्यांग मुलीची भूमिका केली आहे. या सिनेमात अनुष्का सोबतच कॅटरिना आणि शाहरुख खान हे देखील लीड रोलमध्ये आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Off to sydney. Looking forward to the new years eve with my one and only @anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

Read More