मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडिया लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांनी त्यांच्या कामगिरीने चांगलीच निराशा केली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा फेल झालेले दिसले.
दरम्यान या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल असं वाटत होतं. मात्र लीसेस्टरचा वेगवान गोलंदाज रोमन वॉकरने विराटचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. त्याने विराटला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मात्र, जेव्हा विराटला अंपायरने आऊट दिलं तेव्हा विराट खूपच नाराज दिसला आणि तो अंपायरशी मैदानावरच भिडला.
जेव्हा बॉल विराटच्या पॅडला लागला तेव्हा विरोधी टीमने अपील केलं. यावेळी मैदानावर अंपायरने देखील बराच वेळ घेतला पण त्यांनी विराटला आऊट करार दिला.
| Kohli (33) lbw Walker.@RomanWalker17 strikes again! This time he hits the pads of Kohli, and after a long wait the umpire's finger goes up.
— Leicestershire Foxes (@leicsccc) June 23, 2022
Out or not out?
IND 138/6
https://t.co/adbXpwig48
#IndiaTourMatch | #LEIvIND pic.twitter.com/iE9DNCUwLO
अंपायरने विराटला आऊट करार देताच त्याला धक्का बसला. यावेळी त्याने हातवारे करून अंपायरकडे आपली नाराजी व्यक्त केली. यादरम्यान 11 सेकंद तो अंपायरला आऊट करार दिल्याबद्दल हुज्जत घातलाना दिसला.
सराव सामन्यात डीआरएस उपलब्ध नसल्याने विराट कोहलीला पवेलियनमध्ये परतणं भाग होतं. दरम्यान यावेळी किंग कोहली नाबाद असल्याचा विश्वास सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला. विराटच्या नाराजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते अंपायरच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत.