Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SA 3rd ODI : LIVE मॅचमध्ये पहिल्यांदाच दिसली विराटची मुलगी, व्हिडिओ व्हायरल

विराटच्या लेकीने स्टेडियममध्ये जे केलं कॅमेरात कैद, व्हिडिओ व्हायरल 

IND vs SA 3rd ODI : LIVE मॅचमध्ये पहिल्यांदाच दिसली विराटची मुलगी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. आज तिसरा वन डे सामना खेळवला जात आहे. भारताने कसोटीसोबत वन डे सीरिजही गमावली आहे. तिसरा वन डे सामना सुरू आहे. या सामन्या दरम्यान क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांना एक गोड बातमी मिळाली. LIVE मॅचमध्ये चक्क विरानुष्काची मुलगी वामिका दिसली. 

लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना त्याचवेळी कॅमेऱ्यामनची नजर अनुष्कावर गेली. अनुष्काच्या कडेवर लहान मुलगी दिसत आहे. ती वामिका असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. 

वामिकाचा पहिला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र सुरुवातीपासूनच वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यात आलं. 1 वर्ष होऊनही वामिकाचा चेहरा चाहत्यांना पाहायला मिळाला नव्हता. LIVE सामन्या दरम्यान वामिकाचा चेहरा दिसल्याने चाहत्यांना खूप जास्त आनंद झाला आहे. 

fallbacks

काहींनी याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर अपलोड केला. तर काहींनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. अनुष्काने मात्र वामिकाचा चेहरा दिसणारा एकही फोटो अजून सोशल मीडियावर शेअर केला नाही. अनुष्काच्याकडेवर वामिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. वामिकाला पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे. 

Read More