IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 28 वा सामना हा रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Royal Challengers Bengluru VS Rajasthan Royals) यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आरसीबी ने फिल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 174 धावांचं टार्गेट अगदी सहज पूर्ण केलं. यात सॉल्टने 65 धावा तर कोहलीने 62 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने नाबाद 40 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मात्र या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या किटबॅगशी छेडछाड करून त्याची बॅट चोरण्यात आली. आरसीबीने त्यांच्या ड्रेसिंग रूममधला व्हिडीओ शेअर केला आहे.
राजस्थानला पराभूत करून आयपीएल 2025 चा चौथा सामना जिंकणारे आरसीबीचे खेळाडू मोठ्या उत्साहात होते. यावेळी आरसीबीच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडू टीम डेव्हिड याने कोहलीच्या किटबॅगमधून बॅट चोरी करण्याचे ठरवले. आरसीबीने सोशल मीडियावर एक क्लिप शेअर केली, यात टीम डेव्हिड म्हणाला की, 'मला बघायचंय की विराट कोहलीला हे कळायला किती वेळ लागतो की आम्ही त्याच्या बॅगमधून एक बॅट चोरलीये'.
Royal Challengers Bengaluru (RCBTweets) April 14, 2025
Dressing room banter on point. What did Tim David take from Virat’s bag? Let’s find out. PlayBoldRCB IPL2025 pic.twitter.com/j9dIP1p2Np
थोड्यावेळाने जेव्हा कोहली ड्रेसिंग रूममध्ये आला आणि किटबॅग पाहून त्याला समजले की त्यातली एक बॅट गायब आहे. तो म्हणाला 'मी काल माझ्या बॅट मोजल्या होत्या. तेव्हा त्या 7 होत्या आणि आता मात्र 6 आहेत. शेवटी त्याला समजलं की त्याची बॅट ही टीम डेव्हिडच्या किट बॅगमध्ये आहे. जेव्हा कोहलीला समजले की टीम डेव्हिडच्या बॅगमध्ये असलेली बॅट त्याचीच आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू आले.
हेही वाचा : 17 वर्षांचा मराठमोळा क्रिकेटर CSK च्या कर्णधाराला करणार रिप्लेस? कोण आहे आयुष म्हात्रे?
विराट कोहलीने राजस्थान विरुद्ध 33 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावा केल्या. यासह राजस्थान विरुद्ध विराटने ठोकलेलं हे अर्धशतक विराटच्या टी 20 करिअरमधील 100 वं अर्धशतक होतं. अशी कामगिरी करणारा विराट हा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरलंय. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याने सर्वप्रथम टी 20 क्रिकेटमध्ये अर्धशतकाचं शतक करण्याची कामगिरी केली होती. सध्या त्याच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये 108 अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड आहे.