Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'देशासाठी खेळण्याचा मला अभिमान आहे....', किंग कोहलीने मोडला 'हा' मोठा विक्रम; जिंकली करोडो भारतीय चाहत्यांची मने

Virat Kohli: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. यावेळी विराटने एक मोठा विक्रम मोडला आहे. 

'देशासाठी खेळण्याचा मला अभिमान आहे....', किंग कोहलीने मोडला 'हा' मोठा विक्रम; जिंकली करोडो भारतीय चाहत्यांची मने

IND VS AUS 1st Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने स्फोटक शतक झळकावले. आदल्या दिवशी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पुढच्या दिवशी कोहलीने दमदार कामगिरी केली.  पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीने 143 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या काळात विराट कोहलीने 69.93 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. विराटच्या या दमदार खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. 


कोहलीने मोडला मोठा विक्रम  

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील त्याचे 30 वे शतक पूर्ण केले आणि अशासोबतच महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम त्याने मागे टाकला. सर डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके झळकावली होती. आता विराट कोहली एकाने त्याच्या पुढे गेला आहे. या शतकासाठी विराट कोहलीला तब्बल 16 महिने आणि 15 कसोटी डावांची प्रतीक्षा करावी लागली. विराट कोहलीने 2018 मध्ये या शहरात खेळलेल्या 123 धावांच्या शानदार खेळीच्या आठवणी ताज्या केल्या.

हे ही वाचा: मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी 'हे' खेळाडू ठरले सर्वात महागडे

अनुष्काला दिली ‘प्लँटिंग किस’

विराट कोहलीने मार्नस लॅबुशेनविरुद्धच्या स्वीप शॉटवर चौकारांसह शतक पूर्ण केले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके पूर्ण करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला. दरवेळी प्रमाणे प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या पत्नी अनुष्काला 'फ्लाइंग किस' दिली. ही किस देऊन त्याने शतक साजरे केले. विराट आवर्जून म्हणाला की, "अनुष्का प्रत्येक सुख-दु:खात माझ्यासोबत आहे. पडद्यामागे घडणाऱ्या सर्व गोष्टी तिला माहीत आहेत." 

हे ही वाचा: यशस्वी जयस्वालचे ऑस्ट्रेलियावर जोरदार आक्रमण! पर्थमध्ये झळकावले शतक; झाला सचिन आणि विराटच्या यादीत सामील

 

 

देशासाठी खेळल्याचा मला अभिमान- विराट कोहली 

विराट कोहली म्हणाला, "देशासाठी कामगिरी केल्याचा मला अभिमान आहे. हे छान वाटते. अनुष्काची उपस्थिती ही खेळी अधिक खास बनवते."
गिलख्रिस्टशी बोलल्यानंतर कोहलीने भारतीय संघातील इतर खेळाडूंसह स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 26,166 प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाला हसत हसत प्रतिसाद दिला.

Read More