मुंबई : टी 20 क्रिकेट सामन्यांचा महाकुंभ समजला जाणार्या आयपीएलचं यंदा 11वे पर्व आहे 7 एप्रिलपासून आयपीएल 11 ला सुरूवात होणार आहे. मुंबई विरूद्ध चैन्नई असा पहिला सामना रंगणार आहे. सध्या सार्याच संघातील खेळाडू कसून तयारी करत आहे. सरावासोबतच आजकाल खेळाडू प्रमोशनमध्येही रंगले आहेत.
विराट कोहलीने आरसीबी संघासोबत केलेली केलेली धम्माल युजवेंद्र चहलने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली, चहल आणि ब्रडम मक्कुलमसोबत थिरकताना दिसत आहे. पहिल्यांदा ब्रॅडम मक्कुलम आरसीबीसोबत खेळणार आहे.
लेग स्पिनर युजवेंद्र चहलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डान्स फ्लोअरवर विराट साथीदारांसोबत डान्स स्टेप मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे.
Warming up for the IPL with these legends @imVkohli @Bazmccullum #PlayBold #IAMRCB #newtwist #moreturn
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 3, 2018
E Sala Cup Namde pic.twitter.com/WVjuyBrSTT
सध्या विराट कोहली नेट प्रॅक्टिक्स करत आहे. अजूनपर्यंत एकदाही आरसीबी संघाने आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकलेले नाही. त्यामुळे यंदा त्यासाठी विराट प्रयत्नशील असेल.
दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यामध्ये कमाल दाखवल्यानंतर विराट कोहलीने निडास ट्रॉफीमध्ये आराम घेतला होता. त्यावेळेस संघाचे नेतृत्त्व क्रिकेटर रोहित शर्माने केले होते.