Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराटनं पुन्हा मारली बाजी, अनुष्कासाठी उचललं 'हे' पाऊल

लॉर्ड्स कसोटीमध्ये यजमान इंग्लंड संघाचा पराभव केल्यानंतर... 

विराटनं पुन्हा मारली बाजी, अनुष्कासाठी उचललं 'हे' पाऊल

मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी कायमच मोस्ट हॅपनिंग कपल्सच्या यादीत अग्रस्थानी आलेली दिसते. विराट आणि अनुष्काच्या नात्यात असणारं प्रेम आणि याच प्रेमाप्रती एकमेकांसाठी ते घेत असणारी मेहनत या साऱ्याचा अनेकांनाच हेवा वाटतो. 

विवाहबंधनात अडल्यानंतर आता एका मुलीचं पालकत्व स्वीकारत ती जबाबदारी मोठ्या धीरानं पेलणारे विरुष्का एकमेकांसाठीही वेळ द्यायला विसरत नाहीत. कधी विराट तर कधी अनुष्का आपल्या जोडीदारासाठी काही खास बेत आखताना दिसतात. यावेळी विराटनं यामध्ये बाजी मारलेली दिसत आहे. 

लॉर्ड्स कसोटीमध्ये यजमान इंग्लंड संघाचा पराभव केल्यानंतर या विजयाचं खास सेलिब्रेशन करण्यासाठी विराट अनुष्काला एका रोमँटीक डेटवर घेऊन गेला. सोशल मीडियावर त्यांच्या या डेटचे फोटो कमालीचे व्हायरल होत आहेत. 

Tendril restaurant या लंडनमधील हॉटेलमध्ये या जोडीनं भेट दिली. त्यावेळी तिथं काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. 

fallbacks

विराट आणि अनुष्काची ही लंच डेट अतिशय खास होती. कारण डेटवर जाण्यासाठीचं कारणंही अतिशय खास होतं. या सरप्राईज डेटसाठी अनुष्कानं फुल स्लीव्ह्सचा लोकरीचा पांढऱ्या रंगाचा एक टॉप आणि फेंट जिन्स असा लूक केला होता. तर, विराटनं फिकट गुलाबी रंगाचा टी शर्ट, ऑफ व्हाईट ट्राऊझर कम ट्रॅक पँट असा लूर केला होता. या दोघांचा लूकही डेटच्या निमित्तानं विशेष गाजला. 

Read More