Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Virat Kohli: अनुष्काच्या तालावर नाचला विराट, पण झाली मोठी चूक; पाहा Video

Virushka Dance Video: नुष्का शर्मा विराट कोहलीसोबत डान्स करताना दिसून आली आहे. 'डान्स पे चान्स' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाबी गाण्यावर नवरा बायकोने केलेला हा डान्स सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.

Virat Kohli: अनुष्काच्या तालावर नाचला विराट, पण झाली मोठी चूक; पाहा Video

Virat Anushka dance Video: आयपीएलच्या (IPL 2023) थरारक सामन्यांची रंगत गेल्या काही दिवसांपासून चांगली रंगल्याचं पहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंळगुरू (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीने दमदार विजय नोंदवला. या सामन्यात चर्चा रंगली ती विराट कोहलीच्या फ्लाईंग किसची (Flying kiss)... लाँग ऑफच्या दिशेने आलेला चेंडू पकडत विराटने आरसीबीच्या विजयाची वाट मोकळी केली. त्यानंतर विराटने स्टॅडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माला (Anushka Sharma) फ्लाईंग किस दिली. अशातच आता विराट आणि अनुष्काचा आणखी एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी तिच्या अतरंगी पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अनुष्काची मोठी क्रेझ आहे. अशातच अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत डान्स करताना दिसून आली आहे. 'डान्स पे चान्स' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाबी गाण्यावर नवरा बायकोने केलेला हा डान्स सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.

व्हिडीओच्या सुरुवातीला विराट आणि अनुष्का (Virushka) दोघंही फुल्ल स्वॅगसह जिममध्ये प्रवेश करतात आणि नाचू लागतात. काळा शर्ट, टोपी, डोळ्यावर चष्मा आणि पांढरी बुट, असा विराटचा निराळा अंदाज, तर रंगेबीरंगी शर्ट आणि स्टायलीश पॅट घालून अनुष्काने ठुमके लगावले. व्हिडिओमध्ये दोघेही एकच स्टेप्स करताना दिसत आहेत. 

पाहा Video 

दरम्यान, नाचत असताना विराटच्या पाय आखडला जातो आणि तो व्हिडिओमधून बाहेर पडतो, त्यावर अनुष्काला हसू देखील आवरलं नाही. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सध्या विराट कोहली आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळतंय. 7 सामन्यात 279 धावा करणारा विराट यंदा आरसीबीसाठी चॅम्पियन ठरणार का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Read More