Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोहलीने टेस्टमध्ये केली गांगुलीची बरोबरी

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 रनने विजय मिळवला.

कोहलीने टेस्टमध्ये केली गांगुलीची बरोबरी

मुंबई : भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 रनने विजय मिळवला.

गांगुलीची बरोबरी

भारताने 2-1 ने सिरीज गमवली. पण शेवटच्या सामन्यात विजयानंतर विराटने गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. जोहान्सबर्गमध्ये विजय मिळवल्यानंतर कोहलीने कर्णधार म्हणून 21 टेस्ट सामन्यात विजय मिळवला आहे. गांगुलीने कर्णधार असतांना 21 टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

धोनी अव्वल स्थानी

भारताला सर्वात जास्त टेस्ट सामने जिंकवण्याच्या बाबतीत कोहली आता गांगुलीच्या बरोबर दुसऱ्या स्थानावर आला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा याबाबतीत पहिल्या स्थानावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून 27 टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Read More