Virat Kohli Viral Video: 12 मे 2025 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूप दुःखद ठरली. या दिवशी क्रिकेट विश्वातील किंग कोहलीने त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. विराट कोहलीने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम पोस्टने सर्वांनाच धक्का दिला. त्याने अचानक कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला आणि निवृत्तीची घोषणा केली. विराटच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते कसोटी क्रिकेट पाहणे बघणार नाहीत असे म्हणत आहेत. त्यांना प्रश्न पडला आहे की किंग कोहलीला असं काय झालं जे त्याने अचानक इतका मोठा निर्णय घेतला. अलीकडेच याबद्दल त्याच्या एका चाहत्याने कोहलीला निवृत्ती का घेतली? असं विचारलं त्यावर विराटने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चला बघुयात काय म्हणाला तो...
निवृत्तीच्या निर्णयानंतर, विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्रेमानंद महाराजांनी विराटला विचारले, "प्रसन्न आहात का?" त्यावर विराटने उत्तर दिले, "हो, सध्या ठीक आहे." त्याच्या या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी टेस्ट क्रिकेट पाहणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी कोहलीच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. अनुष्का आणि विराट एपोर्टवर स्पॉट झाले तेव्हा एक चाहत्याने त्याला विचारले की, "तुम्ही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? त्यामुळे आता टेस्ट क्रिकेट बघणार नाही. हे ऐकून विराट कोहलीने हात दाखवला आणि यानंतर कोहलीने 'धन्यवाद' म्हटले. हे बोलून तो गाडीत बसला. कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
Virat Kohli and Anushka Sharma at Mumbai Airport
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) May 13, 2025
- Paps to Virat : Virat sir why did you take retirement? We will not see cricket any more! pic.twitter.com/rXY8k4iqN4
विराट कोहली भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातील चौथा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यांच्या नावावर 9,230 धावा आहेत, काही धावांसाठी विराटची १० हजारांची धावसंख्या राहिली आहे. आता निवृत्तीनंतर तो 10,000 धावांचा टप्पा गाठू शकला नाहीये. कोहलीने एका मुलाखतीत म्हटले होते की, "मी टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करू इच्छितो." पण आता या स्वप्नाला पूर्णविराम लागला आहे.